IPL 2025 : 'या' दिवशी सुरु होणार आयपीएल, अंतिम सामना कुठे खेळला जाईल?, महत्त्वाचे अपडेट आले समोर!
IPL 2025 Update After India Pakistan Ceasefire : भारत पाकिस्तान मध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल सामने अचानक रद्द करण्यात आले होते. अशातच आता दोन्ही देशांमध्ये सीजफायरचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने सर्व १० आयपीएल फ्रँचायझींना मंगळवारपर्यंत एकत्र येण्यास सांगितले आहे. कारण, आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल लवकरात लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे. काही अहवालानुसार, आयपीएल लीग 16 मे पासून सुरू होऊ शकते आणि अंतिम सामना 30 मे रोजी खेळला जाऊ शकतो, असा दावा केला जात आहे.

सीमेपलीकडून सुरू असलेल्या तणावामुळे बीसीसीआयने शुक्रवारी आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी पुढे ढकलले. स्थगितीच्या वेळी, आयपीएल २०२५ मध्ये ५८ सामने पूर्ण झाले होते - १२ लीग स्टेज सामने आणि प्लेऑफ शिल्लक होते. आयपीएल सामने थांबविण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच, सर्व फ्रँचायझींचे क्रिकेटपटू तसेच बहुतेक सपोर्ट स्टाफ आपापल्या घरी आणि खेळाडू त्यांच्या देशांना रवाना झाले आहेत.
या चार ठिकाणी होणार सामन्यांचे आय़ोजन?
एका बड्या वृत्तवाहिणीने दिलेल्या माहितीनुसार, "बीसीसीआय आयपीएल 30 मे पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. बीसीसीआय 16 मे पासून उर्वरित सामने चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद या तीन ठिकाणी आयोजित करण्याचा विचार करत आहे.
आयपीएल फ्रँचायझींचे नवीन वेळापत्रक रविवारी रात्रीपर्यंत जाहीर केले जाईल, असेही सांगितले गेले होते. 12 सामने शिल्लक असताना, बीसीसीआयला उर्वरित सामने पूर्ण करण्यासाठी किमान दोन आठवडे लागतील कारण प्लेऑफ आणि अंतिम सामन्यासाठी किमान 6 दिवस लागतात.
सर्व भागधारकांशी चर्चा होणार!
यापूर्वी, बीसीसीआयच्या एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोर्ड पुढील 48 तासांत सर्व भागधारकांशी चर्चा करेल. सूत्रांनी सांगितले की, "पुढील 48 तासांत, आम्ही लीग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी उर्वरित सामने आयोजित करणाऱ्या फ्रँचायझी, ब्रॉडकास्टर, प्रायोजक आणि राज्य संघटनांशी सल्लामसलत सुरू करू.
सध्या आयपीएलचे महत्त्व लक्षात घेता, ते पुन्हा सुरू करण्याचा वेळ ठरवण्यापूर्वी भारत सरकारची मान्यता घेणे देखील महत्त्वाचे असणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बीसीसीआय आयपीएल पुन्हा सुरू करण्याची तारीख औपचारिकपणे जाहीर करेल."












Click it and Unblock the Notifications