IPL 2025: या 5 दिग्गज खेळाडूंना IPL लिलावात 20 कोटी रुपये मिळू शकतात

IPL 2025 Auction: आयपीएल लिलावात दिग्गज खेळाडूंसाठी बोली युद्ध रंगणार आहे. या लिलावात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश असणार आहे. रिटेन्शन लिस्टमध्ये समाविष्ट नसलेल्या खेळाडूंना आता या लिलावात मोठी बोली लागणार आहे. मेगा लिलावासाठी राखीव यादी आधीच प्रसिद्ध झाली आहे.

असे अनेक खेळाडू असतील ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात बोली लावली जाऊ शकते. एखाद्या खेळाडूवर 20 कोटींची बोली लागल्यास आश्चर्य वाटायला नको. तुम्हाला अशा पाच खेळाडूंबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यांच्यावर 20 कोटी रुपयांची मोठी बोली लावली जाऊ शकते.

jos buttler and rishabh pant

ऋषभ पंत
दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार ऋषभ पंतला यावेळी मोठी रक्कम मिळू शकते. प्रत्येक संघ त्याला आपल्यासोबत सामावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या वेळी त्यांला दिल्लीच्या संघाने 16 कोटी रुपये देऊन खरेदी करण्यात आलं होतं. यावेळी ऋषभ पंतसाठी 20 कोटींची बोली लावली जाऊ शकते.

केएल राहुल
केएल राहुल हा आयपीएलमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याला गेल्या वर्षी लखनऊ सुपर जायंट्सकडून 17 कोटी रुपये मानधन मिळाले होते. यावेळी तो लिलावात आहे. केएल राहुल सारख्या दिग्गज खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी प्रत्येक संघ पुढाकार घेऊ शकतो. त्यासाठी त्याला 20 कोटी रुपयांपर्यंतची बोली लावली जाऊ शकते.

श्रेयस अय्यर
गेल्या वर्षी केकेआरला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यर आता संघातून मुक्त करण्यात आलं आहे. केकेआरकडून त्याला 12 कोटी 25 लाख रुपये मिळायचे. यावेळी कोणते संघ त्यांच्यावर बोली लावतात हे पाहणे महत्वाचे आहे. श्रेयस अय्यरवर 20 कोटी रुपयापर्यंत बोली लागू शकते.

जोस बटलर
जर कोणत्याही परदेशी खेळाडूला सर्वाधिक मागणी असेल तर तो जोस बटलर असू शकतो. त्याला राजस्थान रॉयल्सकडून दुप्पट रक्कम मिळू शकते. बटलरचा मागच्यावेळी 10 कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. यावेळी त्याला 20 कोटी रुपयांपर्यंत बोली लागू शकते.

जॅक फ्रेझर मॅक-गुर्क
गेल्या मोसमात दिल्लीकडून खेळलेल्या या क्रिकेटरमध्ये यावेळी अनेक संघ रस दाखवू शकतात. त्यांच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी 9 सामने खेळताना त्याने एकूण 330 धावा केल्या होत्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+