कोण आहे शाहजेब खान ? भारतीय गोलंदाजांची धुलाई करत झळकावलं दीड शतक
Asia Cup 2024 Under 19 : आशिया कप 2024 चा तिसरा सामना भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सकाळी 10. 30 वा. सुरुवात झाली. पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानी फलंदाजांनी कर्णधार शाह बेग चा निर्णय योग्य असल्याचं सिध्द केलं आहे.या सामन्यात पाकिस्तान संघाने 50 षटकात 7 विकेट गमावत 281 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी 281 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

पाकिस्तानच्या एका युवा फलंदाजने या सामन्यात आक्रमक खेळी करत दमदार शतक झळकावलं आहे. सलामीला आलेल्या शाहजेब खानने 107 बॉलमध्ये हे शतक झळकावलं आहे. पाकिस्तान संघाला ही धावसंख्या गाठण्यात 19 वर्षीय सलामीवीर फलंदाज शाहजेब खानच्या शतकी खेळीचा मोठा वाटा आहे. पहिल्या विकेटसाठीच्या त्याने सहकारी सलामीवीर फलंदाज उस्मान खानच्या साथीने संघाला 160 धावांची दमदार सुरुवात करून दिली. या सामन्यात शाहजेबने 147 चेंडूत 10 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 159 धावांची दमदार खेळी केली आहे.
कोण आहे शाहजेब खान?
शाहजेब खान यांचा जन्म 5 ऑक्टोबर 2005 रोजी पाकिस्तानातील मानसेरा शहरात झाला आहे. त्यांचे सध्याचे वय 19 वर्षे 56 दिवस आहे. शाहजेब डाव्या हाताने फलंदाजी करतो. याशिवाय डावखूरा स्पिननर पण आहे .
षटकारचा केला विक्रम
या सामन्यात शाहजेब खानने 10 षटकार मारून एक मोठा विक्रमही मोडला आहे. तो आता अंडर-19 क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. याआधी कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूला एका सामन्यात 7 पेक्षा जास्त षटकार मारता आले नव्हते. शाहजेब खानच्या आधी हा विक्रम कामरान गुलाम आणि शमील हुसैन यांच्या नावावर होता. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी 7 षटकार मारण्याचा पराक्रम केला. पण आता शाहजेब पुढे गेला आहे.
शाहजेब खानची प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द
19 वर्षीय शाहजेबने पाकिस्तानसाठी आतापर्यंत फक्त एकच प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला आहे. जिथे त्याने दोन डावात 8.50 च्या सरासरीने 17 धावा केल्या आहेत. येथे त्याची सर्वोत्तम फलंदाजी 16 धावांची आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन चौकार मारले आहेत.












Click it and Unblock the Notifications