IND vs NZ 3rd ODI : आज भारत vs न्युझीलंड तिसरा वनडे मॅच! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल फ्री लाईव्ह ?
India vs new zealand 3rd odi live streaming free match details : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका आता थरारक वळणावर आली आहे. वडोदरा आणि राजकोटमधील सामन्यांनंतर ही मालिका सध्या १-१ ने बरोबरीत असून, आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर निर्णायक 'फायनल' सामना रंगणार आहे. भारतीय संघासाठी ही मालिका जिंकण्याची मोठी संधी असून, युवा कर्णधार शुभमन गिलच्या बॅटकडून चाहत्यांना मोठ्या शतकाची अपेक्षा आहे.

मालिकेत १-१ ची बरोबरी, आज मालिकेचा फैसला
भारतीय संघाने वडोदरा येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवला होता. मात्र, राजकोटमध्ये न्यूझीलंडने दमदार पुनरागमन करत भारताचा पराभव केला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आज इंदूरमध्ये होणारा तिसरा आणि अंतिम सामना जो संघ जिंकेल, तो या मालिकेचा विजेता ठरेल.
कर्णधार शुभमन गिलवर मदार
टीम इंडियाची ताकद त्यांची फलंदाजी आहे. कर्णधार शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने या मालिकेत सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. इंदूरचे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते, त्यामुळे गिल आपल्या या फॉर्मचे रूपांतर मोठ्या शतकात करेल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे बाहेर असल्याने निवडीचे काही आव्हान भारतीय संघासमोर असेल.
न्यूझीलंडचे आव्हान
मायकल ब्रेसवेलच्या नेतृत्वाखालील किवी संघाने राजकोटमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. डॅरिल मिशेलची स्फोटक फलंदाजी आणि काइल जेमिसनची भेदक गोलंदाजी भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. राजकोटप्रमाणेच इंदूरमध्येही हाय-स्कोअरिंग मॅच होण्याची शक्यता आहे.
सामन्याचे सविस्तर तपशील (Match Details)
सामना कधी : रविवार, १८ जानेवारी २०२६.
सामना कुठे होणार : होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर.
सामन्याची वेळ काय : दुपारी १:३० वाजता (नाणेफेक दुपारी १:०० वाजता).
मॅच लाईव्ह टेलिकास्ट टीव्हीवर कुठे पाहाल : स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण. तसेच DD Sports वर विनामूल्य (Free-to-air) पाहता येईल.
मॅच लाईव्ह स्ट्रीमिंग (Mobile/Web) मोबाईल वेबसाईटवर कुठे पाहाल : डिस्ने+ हॉटस्टार (Disney+ Hotstar) ॲप आणि वेबसाइटवर.
हेही वाचा : अंडर-19 वर्ल्डकपमध्ये वैभव सूर्यवंशीचा धमाका! विराट कोहलीचा 'तो' विक्रम मोडला, बांगलादेशला चारली धूळ
हेही वाचा : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा! 'या' स्टार खेळाडूचे पुनरागमन, संपूर्ण संघ बघा












Click it and Unblock the Notifications