ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा! 'या' स्टार खेळाडूचे पुनरागमन, संपूर्ण संघ बघा
India Women's Squad Australia Tour 2026 Announced : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारत ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय (ODI) सामने खेळणार आहे. त्यानंतर ६ मार्चपासून पर्थमध्ये एकमेव कसोटी सामना खेळवला जाईल, ज्याचा संघ नंतर जाहीर केला जाईल.

संघात मोठे बदल आणि नवीन चेहरे
या दौऱ्यासाठी भारतीय निवड समितीने काही धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यानुसार संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जात आहे तर स्टार खेळाडूचे पुनरागमन झाले आहे.
टी-२० संघ: ऑफ-स्पिनर श्रेयंका पाटील आणि फलंदाज भारती फुलमाळी यांनी संघात पुनरागमन केले आहे. त्यांच्या समावेशामुळे भारताची मधली फळी आणि फिरकी विभाग अधिक मजबूत झाला आहे.
एकदिवसीय संघ: यष्टीरक्षक जी. कमलिनी आणि डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्मा यांना प्रथमच राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाज काश्वी गौतमचाही १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.
Presenting #TeamIndia’s squad for ODI & T20I series against Australia Women 🙌
— BCCI Women (@BCCIWomen) January 17, 2026
Details ▶️ https://t.co/UCScQnfJdi#AUSvIND pic.twitter.com/afB4dqfNco
'या' खेळाडूंना डच्चू
बीसीसीआयने काही खेळाडूंना डच्चूही दिला आहे. वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी आणि फिरकीपटू राधा यादव यांना एकदिवसीय संघातून वगळले आहे, तर हरलीन देओलला टी-२० संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
- टी-२० आणि वनडे मालिका: १५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६
- एकमेव कसोटी (पर्थ): ६ ते ९ मार्च २०२६
भारतीय महिला संघ (संपूर्ण स्क्वॉड)
भारतीय महिला टी-२० संघ (T20I Squad)
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), जी. कमलिनी (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, भारती फुलमाळी, श्रेयंका पाटील.
भारतीय महिला एकदिवसीय संघ (ODI Squad)
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), जी. कमलिनी (यष्टीरक्षक), काश्वी गौतम, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल.
-
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Health News : जोडीदाराला किस करणं पडू शकतं महागात! वेळीच सावध व्हा, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
केरळमध्ये पुन्हा 'लाल वादळ' की काँग्रेसची सरशी? ओपिनियन पोलचे आकडे समोर; पाहा कोणाला मिळणार सत्ता! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य







Click it and Unblock the Notifications