Ind vs sl match free : भारत-श्रीलंका सामना फ्रि लाईव्ह कुठे पाहाल? येथे पाहू शकता, जाणून घ्या फंडा
Ind vs sl match free kuthe baghayacha : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत अंतीम फेरीत पोहचला असून टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. सुपर ४ मधील शेवटचा सामना आज २६ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका या संघादरम्यान होईल. हा सामना रात्री ८:०० वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल आणि टॉस सायंकाळी ७:३० वाजता होईल. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकही पराभव पत्करलेला नाही. भारताने दिमाखदार कामगिरी केली असून ती अशीच आजही सुरु राहील,आज भारतीय संघ विजयासाठी खेळणार आहे. भारताने आधीच अंतीम फेरीत आपले स्थान निश्चित केले असून श्रीलंकेला आपला आत्मसन्मान राखण्याची गरज आहे, कारण या स्पर्धेत त्यांची कामगिरी सुमार अशी राहीली आहे. भारतासाठी हा सराव सामना असून अंतिम फेरीपूर्वी रंगीत तालिम आणि रणनीतीवर भारतीय संघ भर देईल.
भारतात हा सामना थेट पाहण्यासाठी, सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल, जिथे तुम्ही तुमच्या पसंतीच्या भाषेत समालोचनाचा आनंद घेऊ शकता. मोबाइलवर सामना पाहण्यासाठी SonyLIV App हा एक पर्याय आहे. तुम्हाला थेट स्ट्रीमिंगसाठी सबस्क्रिप्शनची आवश्यकता असेल.
टीव्हीवर लाईव्ह मॅच
तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर हा सामना लाईव्ह पाहू शकता. जर तुमच्याकडे केबल किंवा डीटीएच कनेक्शन नसेल, तर तुम्ही डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर सामन्याचे थेट प्रक्षेपण मोफत पाहू शकता.
मोबाईलवर लाईव्ह मॅच
मोबाईलवर सामना पाहण्यासाठी सोनी लिव्ह (SonyLIV) ॲप हा चांगला पर्याय आहे. यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
जर तुम्ही JioTV किंवा Airtel Xstream चे ग्राहक असाल, तर तुम्हाला तुमच्या रिचार्ज प्लॅनसोबत सोनी लिव्हचे सबस्क्रिप्शन मोफत मिळू शकते.
मोफत लाईव्ह मॅच कुठे बघायचा?
तुम्ही या रोमांचक सामन्याचा आनंद अगदी मोफत घेऊ शकता तेही टीव्हीवर, यासाठी ज्या क्रिकेट चाहत्यांकडे केबल किंवा डीटीएच कनेक्शन नाही, त्यांच्यासाठी डीडी स्पोर्ट्स (DD Sports) वाहिनीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण मोफत पाहता येईल. हा सर्वात सोपा आणि सरळ पर्याय आहे.
सामन्याचा दिवस तारीख वेळ
सामना : भारत विरुद्ध श्रीलंका, आशिया कप २०२५ सुपर-४
तारीख : शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५
ठिकाण : दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
टॉसची वेळ : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता












Click it and Unblock the Notifications