Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 3 गडी राखून विजय! वरुण चक्रवर्ती नावाचं वादळ! घेतल्या 4 ओव्हरमध्ये 5 विकेट

IND vs SA T 20 2nd South Africa win over India : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामना रोमांचक झाला. या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेने 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने 124 धावांचे आव्हान दिले होते हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने पार केले.

भारताचा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्ती चांगलाच चमकला. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला नांगी टाकायला लावली. त्याने 4 ओव्हरमध्ये तब्बल 5 विकेट्स घेत आफ्रिकन फलंदाजांना पेव्हेलियनचा रस्ता दाखवला.

IND vs SA T 20 2nd South Africa win over India

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारतीय क्रिकेट संघाच्या चार सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज 10 नोव्हेंबरला खेळवला गेला. उभय संघांमधला पहिला सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळवला गेला. तत्पूर्वी पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला. यानंतर टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.

दरम्यान, दुसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून केवळ 124 धावा केल्या. भारतातर्फे केवळ हार्दीक पांड्याच चांगली बॅटींग करु शकला. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 125 धावा करायच्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पाचवा मोठा धक्का बसला. हेन्रिक क्लासेन 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धावसंख्या 66/5 झाली होती इथे भारताला संधी होती , आणखी दोन विकेट आफ्रिकेच्या पडल्या. यानंतर भारत विजयी होईल ही आशा होती पण आफ्रिकन फलंदाजांच्या चांगल्या खेळीने ती मावळली आणि भारतावर आफ्रीकेने तीन गडी राखून विजय मिळवला.

वरुनच्या गोलंदाजीवर 4 बोल्ड, एक कॅच आऊट

खराब परिस्थितीतून भारतीय संघाला सामन्यात परत आणून चक्रवर्तीने आपल्या गोलंदाजीचे चक्र असे काही फिरवले की, आफ्रीकन खेळाडू खेळपट्टीवर टीकाव धरु शकले नाही. त्याच्या गोलंदाजीचे पृथ्थकरणाने खळबळ उडाली आहे. आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजाच्या विकेट्स वरुण चक्रवर्तीने घेतल्या. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये दक्षिण आफ्रिकेला चकित केले.

डावाच्या दुसऱ्या विकेटसाठी एडन मार्करामला बाद करून वरुणने दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला. यानंतर त्याच्या चेंडूंवर फलंदाजांना काहीच करता आले नाही. फलंदाज एकामागून एक बाद होत राहिले. वरुणने हॅट्ट्रिकचा चान्स होता, पण तो त्याने गमावला. त्याने चौथ्या षटकात पाचवी विकेट घेतली. वरुणच्या चेंडूवर बाद झालेल्या फलंदाजांमध्ये मार्कराम, हेंड्रिक्स, जॅनसेन, क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांचा समावेश आहे.

17 धावांत 5 बळी 13 डाॅट बाॅल्स

वरुनने 4 षटकांत 17 धावा देत 5 बळी घेतले. अलीकडे केकेआरने त्याला आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कायम ठेवले आहे. वरुण चक्रवर्तीला 11 कोटी रुपयांसाठी कायम ठेवण्यात आले आहे. इंजिनियर असलेल्या वरुनने क्रिकेट सोडून नोकरी सुरु केली होती पण नंतर तो पुन्हा क्रिकेटकडे वळाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+