Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

टीम इंडिया पराभूत! आफ्रिका 51 धावांनी विजय; डीकॉकचे वादळ, भारतीय गोलंदाजांनी टाकले 'एवढे' बाॅल वाईड

IND vs SA 2nd T20 Result : कटक येथे पहिल्या T20 सामन्यात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन केले आहे. गुरुवारी (११ डिसेंबर २०२५) झालेल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा ५१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह, ५ सामन्यांची ही रोमांचक मालिका आता १-१ च्या बरोबरीवर आली आहे.

IND vs SA 2nd T20 Result

भारतीय वेगवान गोलंदाजी सुमार

गंभीर बाब म्हणजे या सामन्यात भारतीय जलदगती गोलंदाजांची सुमार कामगिरी ठरली. यात अर्शदीप सिंह याने तर आतापर्यंतची सुमार गोलंदाजी केली. फुलटाॅस गोलंदाजी करत त्याने व जसप्रित बुमराहला षटकाराचे फटकार गोलंदाजीतून मिळाले.

डीकॉकचे तुफान

टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. सलामीवीर क्विनटन डीकॉकने ९० धावांची तुफानी खेळी साकारली, ज्यात त्याने चौकार आणि षटकारांची बरसात केली.

विशाल लक्ष्य

मधल्या फळीतील महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून २१३ धावांचा विशाल स्कोर उभा केला. या सामन्यात भारतीय गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. खास बाब म्हणजे अर्शदीप, बुमराहची शेवटची तीन षटकं खूपच महागात पडली. या षटकात आफ्रीकेने ४१ धावा वसूल केल्या.

टॉसची चूक

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय यावेळी चुकीचा ठरला, ज्याचा फायदा आफ्रिकेने मोठा स्कोर उभारत घेतला. एरव्ही भारतीय संघ टाॅस हरतो आणि सामना जिंकतो यावेळी उलट झाले, टाॅस जिंकून उपयोग झाला नाही आणि संघ पराभूतही झाली.

तिलक वर्माची झुंज व्यर्थ; टॉप ऑर्डर फ्लॉप

२१४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. शुभमन गिल 'गोल्डन डक'वर (शून्य) बाद झाला, तर अभिषेक शर्माने केवळ १७ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवसह संपूर्ण शीर्ष फळी पूर्णपणे फ्लॉप ठरली. युवा फलंदाज तिलक वर्मा याने एकहाती झुंज देत ३४ चेंडूंमध्ये ५ षटकार आणि २ चौकारांसह ६२ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून मजबूत साथ मिळाली नाही.

बार्टमॅनचा भेदक मारा

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ओटनील बार्टमॅन याने भेदक आणि अचूक गोलंदाजी करत भारतीय मधल्या फळीला खिळखिळे केले. बार्टमॅनने ४ बळी घेत भारताला १९.१ षटकांत केवळ १६२ धावांवर ऑल आऊट केले आणि दक्षिण आफ्रिकेला मोठा विजय मिळवून दिला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+