T20 World Cup 2026 : टीम इंडियाचा आज नामीबियाशा सामना! कधी आणि कुठे पाहाल LIVE मॅच वाचा डिटेल्स
IND vs NAM T20 World Cup 2026 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघ आपला विजयाचा रथ पुढे नेण्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजी ग्रुप-ए मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना नामीबियाशी होणार आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून, पहिल्या सामन्यातील चुका सुधारून आता मोठी धावसंख्या उभारण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल, तर नामिबिया संघ विजयासाठी आसुसलेला असेल.

पहिल्या विजयानंतर भारत दुसऱ्या विजयाच्या प्रतिक्षेत
७ फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेवर विजय मिळवला खरा, पण त्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला होता. ७७ धावांवर ६ विकेट्स पडल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद ८४ धावांची खेळी करून संघाला सावरले होते. टॉप ऑर्डरची अपयशी कामगिरी ही चिंतेची बाब असून नामीबियाविरुद्ध फलंदाज फॉर्मात येण्याची दाट शक्यता आहे.
अभिषेक शर्माबाबत मोठी अपडेट
भारतीय संघाचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माला रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे, ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मात्र, इन्फेक्शन आणि वजन घटल्यामुळे त्याचे खेळणे अद्याप संशयास्पद आहे. अशा स्थितीत संजू सॅमसनसोबत ईशान किशन डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. वॉशिंग्टन सुंदरच्या फिटनेसबाबतही कर्णधाराने सकारात्मक अपडेट दिल्याने गोलंदाजी अधिक मजबूत होईल.
नामीबियासाठी मोठे आव्हान
दुसरीकडे, गेरहार्ड इरास्मसच्या नेतृत्वाखालील नामीबियाची सुरुवात खराब झाली आहे. नेदरलँड्सविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने त्यांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत आहे. जगातील नंबर-१ टी-२० संघ असलेल्या भारताविरुद्ध टिकण्यासाठी त्यांना आपली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यात मोठी सुधारणा करावी लागेल.
सामन्याची वेळ आणि लाईव्ह टेलिकास्ट (Live Streaming Details):
- तारीख: गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६
- स्थळ: अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
- टॉस: सायंकाळी ६:३० वाजता
- सामना सुरू: सायंकाळी ७:०० वाजता
- टीव्ही प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports)
- लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओस्टार (JioStar) ॲप आणि वेबसाईट
भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षरसिंग, वॉशिंगटन पटेल, सनकू पटेल.
नामिबियाचा संघ : गेर्हार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन, बर्नार्ड शॉल्ट्झ, रुबेन ट्रम्पेलमन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, लॉरेन स्टीनकॅम्प, मालन क्रुगर, निकोल लॉफ्टी-ईटन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, जेसी बाल्ट, डायलन लीचर, मॅक्स एच मायसोबर्ग, मॅक्सिंग एच.












Click it and Unblock the Notifications