IND vs ENG: भारत-इंग्लंड T20 साठी तिकिटे कुठे आणि कशी खरेदी करायची? किमान किंमत किती ?
IND vs ENG T20 Tickets: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेतील सामन्यांमध्येही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील शेवटचा टी-20 सामना विश्वचषकादरम्यान खेळला गेला होता आणि त्यात टीम इंडियाने मोठा विजय मिळवला होता.
टी-20 मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. हा सामना 22 जानेवारी रोजी खेळला जाईल. सामन्याची तिकिटेही विक्रीसाठी तयार आहेत. तिकीट विक्री सुरू झाली आहे. चाहते आपल्या घरी बसून आरामात ही तिकिटे ऑनलाइन खरेदी करू शकतात.

कोलकातामध्ये तिकिटे तुलनेने स्वस्त आहेत. तिकिट विक्रीला थोडा उशिरा सुरुवात झाली असली तरी चाहत्यांकडे ती खरेदी करण्यासाठी अजूनही वेळ आहे. ही तिकिटे वेगवेगळ्या किमतीत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. तिकिट जितके महाग असेल तितके दृश्य चांगले दिसेल.
भारत-इंग्लंड टी-20 मालिकेसाठी तिकिटे कुठून खरेदी करायची?
किक्रेटप्रेंमी BookMyShow वर चाहत्यांनी तिकिटे तपसाली आहेत. याशिवाय, पेटीएम इनसाइडरवरही तिकिटे आली नाहीत. या दोघांव्यतिरिक्त, तिसरा प्लॅटफॉर्म आहे जिथे तिकिटे ऑनलाइन खरेदी करता येतील. झोमॅटोच्या डिस्ट्रिक्ट एप्लीकेशनवर ही तिकिटे उपलब्ध आहेत. तिकिटे त्यांच्या वेबसाइट district.in ला भेट देऊन देखील खरेदी करता येतील. तुम्हाला तिथे एक अंकाऊंट तयार करावे लागेल.
भारत-इंग्लंड टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी तिकिटांची किंमत
कोलकाता येथे होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी किमान तिकिटाची किंमत 800 रुपये आहे. यानंतर किंमत वाढतच राहते. तिकिटांची किंमतही अनुक्रमे 1300 आणि 2000 रुपये ठेवण्यात आली आहे. कमाल दराबद्दल बोलायचे झाले तर ते 2500 रुपये ठेवण्यात आलं आहे. तसेच तिकिटाच्या किंमतीत वाढ ही होऊ शकते.
भारत-इंग्लंड टी-20 सामना कुठे पाहायचा
भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. तुम्ही जिओ सिनेमावर हे सामने लाईव्ह पाहू शकता. याशिवाय स्पोर्ट्स 18 वर थेट प्रक्षेपण देखील पाहता येईल. हे सामने जिओ सिनेमाच्या वेबसाइट आणि अॅप्लिकेशनवर प्रसारित केले जातील.












Click it and Unblock the Notifications