IND vs ENG Live updates : भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेचे वेळापत्रक; कुठे होणार मॅच?
ind vs eng odi series 2025 : भारत आणि इंग्लड या संघात T-20 सामन्याची मालिका भारताने जिंकली. त्यानंतर इंग्लंड संघ आता एकदिवसीय मालिकेत भाग घेण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि इंग्लंडसाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तयारीसाठी ही एक उत्तम संधी असेल. भारत आणि इंग्लंड 6 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येतील.
दोन्ही संघ ही मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील तसेच दोन्ही संघांचे ध्ये विजय प्राप्त करणे आणि सिरीज जिंकणे हेच आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला भारताविरुद्धच्या T-20 मालिकेत 4-1 असा पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंड संघ आता जुना पराभव विसरून एकदिवसीय सामन्यात दमदार पुनरागमन करत आहे तर, दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल सारख्या अनुभवी खेळाडूंच्या पुनरागमनामुळे भारतीय संघात मोठा बदल झालेला दिसतो. या मालिकेत भारताला आपली ताकद दाखवण्याची उत्तम संधी असेल.

भारताला श्रीलंकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला
गेल्या वर्षी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली नवीन क्रिकेटची इनिंग सुरू करताना, भारताने श्रीलंकेत फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले. मात्र, रोहितच्या संघाला 28 वर्षांत श्रीलंकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय मालिका पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, इंग्लंड संघ 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर गमावलेली चमक परत मिळवण्याचा प्रयत्न करेल.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
- पहिला एकदिवसीय सामना - 6 फेब्रुवारी (नागपूर)
- दुसरा एकदिवसीय - 9 फेब्रुवारी (कटक)
- तिसरा एकदिवसीय - 12 फेब्रुवारी (अहमदाबाद)
कुठे पाहाल लाईव्ह सामना
- 6 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेचा लाईव्ह सामना तुम्ही कुठे पाहू शकता ते जाणून घेऊया. या सामन्याचा नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल.
- भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.
- भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केली जाईल.
- तर सामना हॉट स्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.
एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघ
भारताचा ONEDAY संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर , यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी
इंग्लंडचा ONEDAY संघ: जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, बेन डकेट, जो रूट, फिलिप साल्ट, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, साकिब महमूद, आदिल रशीद, मार्क वूड.












Click it and Unblock the Notifications