Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind vs Aus: रोहित शर्माची निवृत्तीसंदर्भात मोठी घोषणा! सिडनी कसोटीदरम्यान मिळाली बिग न्यूज

Ind vs Aus Rohit sharma : भारतीय संघ नियमित एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माने स्वतः सिडनी कसोटीतून बाहेर पडण्यावर आपली भुमिका स्पष्ट केली आहे. त्याने सांगितले की, त्याला कसोटी संघातून वगळण्यात आलेले नाही, उलट त्यानेच या सामन्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा म्हणतो की, हा निर्णय त्याच्या तंदुरुस्ती आणि सामन्यांच्या प्राधान्यक्रमानुसार घेण्यात आला आहे.

रोहित शर्माची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नव्हती (Ind vs Aus, Rohit Sharma)

एकीकडे रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल चर्चा होत आहे, कारण गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नव्हती. असे असूनही, रोहितने सांगितले की, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि संघ व्यवस्थापनाच्या दबावाखाली नाही. कारण काही मीडिया रिपोर्ट्समध्ये रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याची बातमी समोर आली होती.

Ind vs Aus

रोहीतचा तो स्वतःचा निर्णय

सिडनी कसोटीदरम्यान रोहितने स्वतः बाहेर बसण्याचा निर्णय घेतला, रोहित शर्माने एका मुलाखतीत सांगितले की, सध्या बॅटींगमधील सुमार कामगिरीमुळे आपण स्वतः बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची ही खेळी संघाच्या हिताची होती, कारण फॉर्मात नसलेल्या खेळाडूंना अशा महत्त्वाच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळू नये, असे त्याला वाटत होते.

हेही वाचा 9 फलंदाजांनी केल्या अवघ्या 9 धावा! 5 जणांना तर भोपळाही फोडता आला नाही! रोहीत, यशस्वी, विराट आज फेल

सध्या संन्यास घेणार नाही...

रोहित शर्माने यावेळी स्पष्ट केले की तो त्याचे क्रिकेट करिअर संपवणार नाही निवृत्तीचा कोणतेही विचार नाही. जरी तो सध्या धावा काढत नसला तरीही. पण पाच महिन्यांनंतर परिस्थिती बदलू शकते आणि धावाही येऊ शकतात, त्यामुळे आपण आपली मेहनत सुरूच ठेवणार असल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा IND vs BAN Test Match : रोहीत शर्माने केला 3 षटकांतच 'हा' विश्वविक्रम! यशस्वी जैस्वालचाही धमाका!

लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसणारे बाहेरचे लोक आपले निर्णय घेऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले. याशिवाय रोहितने स्वतः एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि असेही म्हटले की सिडनीला आल्यानंतर त्याने व्यवस्थापनाला कळवले होते की तो शेवटचा सामना खेळणार नाही, कारण तो सतत प्रयत्न करत होता पण धावा काढत नव्हता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+