Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चीकू ते रनमशीन अशी ओळख बनवलेला विराट होतोय 36 वर्षांचा; वाचा- त्याच्या करिअरमधील 5 रेकॉर्ड्स

Virat Kohli Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा रनमॅन विराट कोहली उद्या मंगळवार (दि.5 नोव्हेंबर) 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल पहिले पाऊल टाकले होते. तत्पूर्वी त्याच्या नेतृत्वात भारताने अंडर 19 वर्ल्डकप जिंकला होता.

विराटने चीकूपासून किंग कोहली आणि ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम होण्यापर्यंत घेतलेली मेहनत जगभरातील सर्व खेळाडूंसाठी विशेष प्रेरणादायी ठरलेली आहे. भारतीय संघ संकटात असला की, त्या संकटकाळात विराटची खेळण्याची हातोटी हेच त्याचे खास वैशिष्ट्य मानले जाते. विराटच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अन् त्याच्या संपूर्ण करिअरमधील खास रेकॉर्ड्स बद्दल...!

Virat Kohli Birthday

विराटच्या आयुष्यातील पाच महत्त्वाचे रेकॉर्ड्स...!

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके ठोकले

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावणारा विराट कोहली हा जगातील पहिला फलंदाज आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध 2023 एकदिवसीय विश्वचषकातील पहिल्या उपांत्य फेरीत त्याने ही कामगिरी केली. विराटने 113 चेंडूत 117 धावा करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 वनडे शतकांचा विक्रम मोडला. विराटने केलेल्या विक्रमाच्या जवळपासही सध्या एकही क्रिकेटर नाही.

वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम

एकाच वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने 2023 एकदिवसीय सामन्यात 11 डावात 765 धावा करत ही कामगिरी केली होती. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याने 2003 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या विश्वचषकात 11 डावात एकूण 673 धावा केल्या होत्या. कोहलीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात 95.62 च्या सरासरीने आणि 90.31 च्या स्ट्राइक रेटसह तीन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली.

सर्वात जास्त प्लेअर ऑफ द सीरीज जिंकण्याचा मान

विराट कोहलीच्या नावावर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम आहे. आत्तापर्यंत, त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 533 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि 161 मालिकांमध्ये 21 वेळा तो प्लेअर ऑफ द सिरीज बनला आहे. त्यापैकी 11 वनडे, 7 टी-20 आणि 3 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. या यादीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 664 सामन्यांच्या 183 मालिकांमध्ये 20 खेळाडूंचे मालिका पुरस्कार जिंकले.

Virat Kohli Birthday

वनडेमध्ये सर्वात जलद 13 हजार धावा करणारा खेळाडू

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 13 हजार धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. अवघ्या 267 डावात त्याने ही कामगिरी केली. विराटने हा पराक्रम सप्टेंबर २०२३ मध्ये कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कप सामन्यात केला होता. सर्वात जलद 13000 वनडे धावा करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 321 डावांमध्ये हा टप्पा गाठला. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा क्रमांक लागतो ज्याने 341 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

टी-20 क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर सर्वाधिक अर्धशतके

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. T20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने 38 अर्धशतकांसह आपल्या कारकिर्दीचा शेवट केला. कोहलीने बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2024 टी-20 विश्वचषक फायनलमध्ये 59 चेंडूत 76 धावा केल्या. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 36 अर्धशतके आणि तीन शतके झळकावली आहेत.

दिल्लीत जन्म, आता तिन्ही फॉरमॅटमधील बादशहा

कोहली हा प्रत्येकी युवा खेळाडूसाठी प्रेरणास्थान आहे. वयाच्या 36 व्या वर्षीही कोहलीचा फिटनेस इतका जबरदस्त आहे की तो अजूनही त्याच्या निम्म्या वयाच्या खेळाडूंना टक्कर देऊ शकतो. विराटचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला. विराटने 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्यापूर्वी त्याच्या नेतृत्वात भारताने अंडर 19 वर्ल्डकप जिंकला होता. आज विराट तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे.

Virat Kohli Birthday

फिटनेसचा राजा म्हणजे विराट कोहली

विराटने आपल्या नेतृत्वाखाली अंडर-19 टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले. 20 ऑगस्ट 2008 रोजी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर पुढील 4 वर्षांत तो संघाचा महत्त्वाचा सदस्य म्हणून उदयास आला. विराट कोहली टीम इंडियाचा सर्वात फिट खेळाडूंपैकी आहे. त्याच्याच प्रेरणेने संघातील इतर खेळाडू तसेच युवा खेळाडू आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देऊ लागले. 2012 पासून आजपर्यंत विराट आपल्या फिटनेसमुळे क्वचितच सामन्यातून बाहेर पडला आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटू विराटकडे कसोटी क्रिकेटचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पाहतात.

कसोटीचा यशस्वी कर्णधार

विराट हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. महेंद्रसिंह धोनीकडून सूत्रे हाती घेतल्यानंतर विराटने 68 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले. यातील 40 सामने भारताने विराटच्या नेतृत्वात जिंकले. कसोटी कर्णधार म्हणून त्याने 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिली मालिका विजयावर नाव कोरले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी मालिका विजय नोंदवला.

वेस्ट इंडिजमध्ये मालिका जिंकली, कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यानंतर 2021 मध्ये प्रथमच टेस्ट चॅम्पियनशिपचे फायनल गाठले. भारतातही कोहलीचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. मायदेशात खेळल्या गेलेल्या 31 पैकी 24 कसोटी सामने भारताने विराटच्या नेतृत्वात जिंकले आहेत. तर फक्त दोन कसोटी सामने गमावले आहेत. व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही विराटच्या कॅप्टन्सीचा रेकॉर्ड उत्तम आहे. विराटने 95 वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यातील 65 सामने जिंकले आहेत तर 27 सामन्यात संघ पराभूत झाला आहे. तसेच, विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशी भूमीवर 42 वनडे सामने खेळले, यातील 29 जिंकले आणि 11 गमावले आहेत.

Virat Kohli Birthday

विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा

किंग कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिला तुम्ही सर्वजण ओळखतच असाल, ती व्यवसायाने बॉलिवूड अभिनेत्री आहे. अनुष्का सध्या चित्रपटांपासून दूर आहे. ती शेवटची काला चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसली होती. दोघांना दोन मुले आहेत. विराट आणि अनुष्काने 2021 मध्ये त्यांच्या मुलीचे स्वागत केले, तिचे नाव वामिका कोहली आहे. त्याच वेळी, या वर्षी 15 फेब्रुवारी 2024 मध्ये, या जोडप्याला एक मुलगा आहे, ज्याचे नाव त्यांनी अकाय कोहली असे ठेवण्यात आलेले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+