Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Fact Check Shahid Afridi's death : शाहिद आफ्रिदीचे निधन? Viral Video मागील काय आहे सत्य, जाणून घ्या

Fact Check Shahid Afridi's death : पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांचे निधन झाल्याचा सोशल मीडियावर समोर आलेल्या एक व्हिडिओने क्रिकेट जगतात खळबळ माजवली आहे. हा हादरवून टाकलेणाऱ्या व्हिडिओत पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदी यांचे निधन झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या व्हिडिओनंतर अनेकजणांना आश्चर्य व्यक्त केले आहे. काही दिवसांपुर्वीच एकदम ठणठणीत असणाऱ्या या क्रिकेटपटूची अचानक एक्झिट कशी झाली असे प्रश्नही सोशल मीडियावर विचारण्यात आल्याचे दिसून आले.

Fact Check Shahid Afridi s death

काही दिवसांपूर्वीपर्यंत शाहिद आफ्रिदी त्याच्या भारतविरोधी विधानांमुळे चर्चेत होता हे ज्ञात आहे. भारतीय लष्कराने चालवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान, शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्य आणि भारतीय जनतेविरुद्ध वादग्रस्त आणि कठोर टीका करणारे वक्तव्य केले होते, या वक्तव्यानंतर आफ्रीदीवर भारतातून ट्रोलही केले गेले. त्याला जशास तसे उत्तर देण्यात आले होते.

आफ्रीदीबद्दल दावा करणाऱ्या अचानक आलेल्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता यामागील खरे सत्य काय आहे ते जाणून घेऊया.

काय म्हटले आहे व्हायरल व्हिडिओत?

या व्हायरल व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की, पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांचे निधन झाले आहे. त्याला कराचीमध्ये दफन करण्यात आले.. व्हिजन ग्रुपच्या अध्यक्षांसह अनेक अधिकाऱ्यांनीही शोक व्यक्त केला आहे असे या व्हिडिओत म्हटले गेले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

..हा व्हिडिओ खरा आहे का?

वरवर हा व्हिडिओ जरी खरा वाटत असला तरीही हा व्हायरल व्हिडिओ एआयद्वारे बनवला आहे. या व्हिडिओत जी माहिती आणि दावे केले गेले त्यात काहीही तथ्य नाही. आफ्रिदीला काहीही झालेले नाही, तो पूर्णपणे ठिकठाक आणि ठणठणीत आहे. त्याच्या मृत्यूची बातमी खोटी आहे, व्हिडिओमुळे अफवा पसरली गेली आहे.

शाहिद आफ्रिदीच्या मृत्यू ही साफ अफवा

शाहीद आफ्रीदीच्या मृत्यूबद्दलचा व्हिडिओ हा निराधार आहे, त्याला कसलाही आधार नाही एआयद्वारे हा व्हिडिओ बनवल्याचे वृत्त आहे, या अफवेचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर आल्याने अनेकांना गैरसमज झालेला आहे.

आफ्रीदीने भारताविरोधात ओकली होती गरळ

भारतात पहलगाम हल्ल्यानंतर साऱ्या जगाने हळहळ व्यक्त केली परंतु पाकिस्तानने तुसभरही संवेदना व्यक्त केल्या नाही,उलट दहशतवाद्यांना आश्रय हा देश देत आला. या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले, या दरम्यान, भारत सरकारने शाहिद आफ्रिदीने भारतीय लष्कराविरोधात वक्तव्य केले होते.

दरम्यान शाहीद आफ्रीदी, शोएब अख्तरसह अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्यात आलेली आहे. शाहिद आफ्रिदीने अनेक वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो बराच काळ राजकीय कार्यात सहभागी आहे.

शाहीद आफ्रीदीची कशी राहीली क्रिकेट कारकिर्द?

शाहिद आफ्रिदीच्या क्रिकेट कारकि‍र्दीबद्दल बोलायचे झाल्यास तो 2017 मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाला. आफ्रिदीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना 11 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने 3 फॉरमॅटमध्ये एकूण 541 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम अजूनही आफ्रिदीच्या नावावर आहे. शाहिद आफ्रिदीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 351 षटकार मारले आहेत. भारतीय स्टार फलंदाज रोहित शर्मा या विक्रमापासून फक्त 7 षटकार दूर आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+