Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विनोद कांबळीला श्रीकांत शिंदेंची 5 लाखांची मदत! उपचारात कोणतीही कमतरता भासू देणार नाही-प्रताप सरनाईक

Eknath Shinde Srikant Shinde's help of 5 lakhs to Kambli : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. एका आजाराने ग्रासल्यानंतर त्याच्यावर रुग्णालय प्रशासन कसोशीने उपचार करत आहे. या रुग्णालयाने त्याच्यावरील उपचार मोफत करण्याची घोषणा केली. यानंतर आता श्रीकांत सशिंदे फाऊंडेशनही कांबळीच्या मदतीला धावले असून त्याला पाच लाखांची मदत करण्यात आली आहे.

प्रताप सरनाईक, मंगेश चिवटेंची रुग्णालयात धाव

यासंदर्भात एक व्हिडिओही जारी झाला असून त्या व्हिडिओत मुख्यमंत्री सहायता कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात जाऊन विनोद कांबळीची भेट घेत व्हिडिओद्वारे एक निवदेन जारी केले आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सांगण्यावरुन ही मदत केली गेल्याचे चिवटे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनीही कांबळीची रुग्णालयात भेट घेतली.

Eknath Shinde Srikant Shinde s help of 5 lakhs to Vinod Kambli

उपचारात कमतरता भासू देणार नाही - प्रताप सरनाईक यांची ग्वाही

विनोद कांबळी याच्यावरील उपचारांमध्ये कोणतीही कमी भासू देणार नाही. त्यांच्या यापुढील उपचाराचा सर्व खर्च आपल्याकडून केला जाईल, असे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या कुटूंबीयांना बुधवारी दिले. सरनाईक यांनी भिवंडीतील रुग्णालयात त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. दरम्यान, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही त्यांच्या श्रीकांत फाऊंडेशनच्या वतीने त्यांना पाच लाखांची मदत देत असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा : विनोद कांबळीपेक्षा युवराज सिंगला दुप्पट पेन्शन! BCCI असे का करते? काय आहे नियम आणि सत्य घ्या जाणून

विनोद कांबळी घेत आहे आकृती रुग्णालयात उपचार

विनोद कांबळी यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल केले आहे. या रुग्णालयास भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची सरनाईक यांनी विचारपूस केली. कांबळी हे भारतीय क्रिकेटमधील एक तेजस्वी नाव आहे, ज्यांनी आपल्या खेळाने देशाला अनेक गौरवाचे क्षण दिले. त्यांच्या डोळ्यांत अजूनही तीच जिद्द आणि लढण्याची उमेद दिसते, जी त्यांच्या खेळात नेहमीच दिसायची. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून लवकरच ते पूर्णपणे बरे होतील, असा विश्वास यावेळी सरनाईक यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : क्रिकेटर विनोद कांबळीची तब्बेत बिघडली; रुग्णालयातील फोटो व्हायरल झाल्याने चर्चा वाढल्या

सरनाईक यांचा कुटुंबियांशी संवाद

प्रताप सरनाईक यांनी यावेळी विनोद कांबळीच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला. यापुढे कांबळीच्या औषध व रुग्णालयाच्या उपचारांमध्ये कोणतीही कमी भासू देणार नाही, असेही सरनाईक यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आश्वासित केले आहे.

हेही वाचा : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींना कोणता आजार आहे?, रिपोर्ट आला समोर, हॉस्पिटलकडून फ्री उपचाराची घोषणा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+