क्रिकेटर विनोद कांबळीची तब्बेत बिघडली; रुग्णालयातील फोटो व्हायरल झाल्याने चर्चा वाढल्या
भारताचा माजी डावखूरा फलंदाज विनोद कांबळीची तब्बेत अचानक बिघडली. त्याच्यावर सध्या ठाण्यातील प्रगती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डाँक्टरांची एक टिम विनोद कांबळीवर उपचार करत आहे. विनोद कांबळीचे रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना एकच धक्का बसला. या प्रकरणाची सध्या चर्चा सुरु आहे.

कांबळीची तब्बेत बिघडली
विनोद कांबळी हा भारताचा माजी क्रिकेटपटु आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी हे दोघेही दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य आहेत. प्रतिभावंत खेळाडू म्हणून नावाजलेला विनोद कांबळी सध्या परिस्थिती व तब्बेतीशी झगडत आहे. आचरेकर सरांच्या स्मारकाच्या कार्यक्रमात या दोघांनीही शिवाजी पार्कवर नुकतीच हजेरी लावली होती. आता विनोद कांबळीची तब्बेत बिघडल्याचे समजते. तब्बेत अचानक बिघडल्याने त्याच्यावर ठाण्यातील प्रगती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
In pictures: Cricketer Vinod Kambli's condition deteriorated again, leading to his admission at Akriti Hospital in Thane late Saturday night. His condition is now stable but remains critical. pic.twitter.com/7NBektzQ54
— IANS (@ians_india) December 23, 2024
कांबळीची दमदार कारकीर्द
विनोद कांबळीने भारतीय संघात सुरु केलेली क्रिकेट कारकिर्दिची सुरुवातीला एकदम दमदार राहिली. 1991 मध्ये त्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 1993 मध्ये त्याने कसोटी संघातही जागा मिळवली. आपल्यातील प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच क्रिकेट जगतात नाव कमावले. मात्र काही दिवसांतच विनोद कांबळीचे नशिब बदलले. 2000 च्या दशकात विनोद कांबळीचा रेकॉर्ड खूपच खराब राहीला. म्हणून त्याला 2000 सालानंतर टीम इंडियात स्थान मिळालं नाही. विनोद कांबळी 2000 साली शारजाहमध्ये शेवटची मालिका खेळला होता. त्यानंतर टीममध्ये कमबॅकसाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
Today meet great cricketer vinod kambli sir in AKRUTI hospital pic.twitter.com/3qgF8ze7w2
— Neetesh Tripathi (@NeeteshTri63424) December 23, 2024
दिग्गज क्रिकेटर मदतीला
आचरेकर सरांच्या कार्यक्रमात आलेल्या विनोद कांबळीला पाहून भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी दुःख व्यक्त केले होते. त्यानंतर कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासारख्या माजी खेळाडूंनी विनोद कांबळीवर उपचार व आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले होते. अनेक माजी खेळाडू विनोद कांबळीसाठी सरसावले होते. त्यातच आता त्याची तब्बेत अचानक बिघडल्याच्या बातम्या आल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला.












Click it and Unblock the Notifications