Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सानिया आणि सायनानंतर आणखी एक घटस्फोट, भारतीय क्रीडा विश्वातील ‘ही' खेळाडूही पतीपासून वेगळी झाली

भारतीय क्रीडा विश्वातील महिलांच्या आयुष्यात सध्या सर्व काही ठीक चाललेलं दिसत नाहीये. गेल्या वर्षी सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर या वर्षी सायना नेहवालचा घटस्फोट झाला. सायना नेहवालचा घटस्फोट दोन दिवसांपूर्वीच झाला होता.

divya kakran divorce

महिला कुस्तीपटू दिव्या काकरानचाही घटस्फोट झाला असून, तिने स्वतःच याची माहिती दिली आहे. काकरानचा विवाह मेरठचा पॉवरलिफ्टर सचिन प्रताप सिंगसोबत झाला होता. ही गोष्ट फार जुनी नाही, अवघ्या दोन वर्षांपूर्वीच दिव्या आणि सचिनचं लग्न झालं होतं.

दिव्याने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिलं आहे की, "नमस्ते, तुम्हाला माहीत आहे की मी दिव्या काकरान आहे. तुमच्यासोबत काही वैयक्तिक गोष्टी शेअर करू इच्छिते. नुकताच मी माझे पती सचिन प्रताप सिंग यांच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण आणि भावनिक टप्पा राहिला आहे. यात वेदना, आत्मपरीक्षण आणि सोडून देण्याची भावना होती."

दिव्याने पुढे लिहिलं, "काही क्षण असेही आले ज्यात स्पष्टता, विकास आणि अशी शक्ती होती, जी माझ्यामध्ये आहे हे मलाही माहीत नव्हतं. ही शेअर करण्यासारखी गोष्ट नव्हती, पण मला वाटलं की तुम्हाला हे कळायला हवं. दूरून का होईना, पण तुमचा पाठिंबा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे."

दिव्याने हेही लिहिलं की, "मी हळूहळू बरी होत आहे आणि या नवीन प्रवासाची सुरुवात आशा आणि शांततेने स्वीकारायला शिकत आहे. कधीकधी आयुष्य अनपेक्षित वळणे घेते आणि मला वाटतं की याबद्दल मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे. मी आता स्वतःला सावरू शकले आहे आणि अजूनही माझा मार्ग शोधत आहे. अशा पद्धतीने प्रगती करत आहे, ज्याची कल्पनाही केली नव्हती."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+