चंपकमुळे बीसीआयच्या अडचणीत वाढ,न्यायलयाकडून नोटीस, काय आहे प्रकरण घ्या जाणून
Ipl 2025 : आयपीएल 2025 चा सीझन आता निर्णयाक टप्पात आला आहे. या सीझनमध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट आणि आक्रमक खेळीने किक्रेटप्रेमींची मने जिंकली आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सुर्यवंशी, पंजाबचा प्रियांश आर्य, चेन्नई सुपर किंग्सचा आयुष म्हात्रे या खेळाडूंनी आपल्या फलदांजांनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आयपीएल अजून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे चंपकचं. चंपकमूळे बीसीआयच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नोटीस जारी केली आहे. ही नोटीस प्रसिद्ध बालपत्रिका 'चंपक' च्या प्रकाशकांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे देण्यात आली आहे. यामध्ये आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेने चालणाऱ्या रोबोट कुत्र्याला 'चंपक' हे नाव देण्यावर ट्रेडमार्क उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे. आता या प्रकरणात न्यायलयाने बीसीसीआयला नोटीस बजावत उत्तर मागितले आहे. ज्यामुळे क्रिकेट आणि व्यावसायिक अधिकार यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बीसीसीआयने आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये एका कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) चालणाऱ्या रोबोट कुत्र्याची ओळख करून दिली, ज्याला चाहत्यांच्या मतदानानंतर 'चंपक' हे नाव देण्यात आले. हा रोबो कुत्रा सामन्यांदरम्यान मैदानावर फिरत असून खेळाडूंशी संवाद साधण्यासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, दिल्ली प्रेस पत्र प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडने 1968 पासून 'चंपक' या बालपत्रिकेची प्रकाशिका आहे. त्यांनी हे नाव त्यांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयने त्यांच्या परवानगीशिवाय हे नाव वापरून व्यावसायिक लाभ मिळवला आहे, जे ट्रेडमार्क कायद्याचा भंग आहे.
प्रकाशकांच्या वकिलांनी न्यायालयात हे नमूद केले की, 'चंपक' हे नाव केवळ एक पत्रिका नसून मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या प्राणी कथांचे आणि वैशिष्ट्यपूर्ण ब्रँडचे प्रतीक आहे. त्यांनी हेही सांगितले की, आयपीएलसारख्या मोठ्या व्यावसायिक उपक्रमात या नावाचा गैरवापर त्यांच्या ब्रँडच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकतो. याउलट, बीसीसीआयच्या वतीने ज्येष्ठ वकील जे साई दीपक यांनी हे नाव फुलाच्या नावावरून घेतले असल्याचा दावा केला आहे.
तसेच हे नाव कोणत्या एका पाक्षिक किंवा मासिकावरुन घेतलेले नसून इतर काही ठिकाणी ही या नावांचा वापर केला जात असल्याचं सांगितले. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतही या एका पात्राचे नाव चंपक असल्याचे सांगितले. तसेच नाव निवडण्यासाठी सोशल मिडीयावर एक पोल घेण्यात आला होता. त्यावेळी क्रिकेटप्रेमींनीच चंपक या नावाला सर्वाधिक आपली पसंती दर्शवली म्हणून या रोबोचं नाव चंपक पडल्याचे सांगण्यात आले.












Click it and Unblock the Notifications