Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इंग्लडविरुद्ध मालिका विजय! टीम इंडियाच्या दीप्ती शर्माने केला हा विक्रम, पाकच्या खेळाडूला टाकले मागे

Deepti Sharma breaks record with 145 wickets : : सध्या भारतीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारच्या टीम इंग्लडमध्ये असून जोरदार कामगिरी करत आहे. तिन्ही संघांनी इंग्लंडच्याही तिन्ही संघांना पराभूत करण्याची किमया साधली. एजबेस्टन कसोटी सामन्यात टीम इंडिया जिंकली. त्यानंतर १९ वर्षाखालील सामन्यात भारतीय युवा टीमने इंग्लंडच्या युवा टीमला धुळ चारली.त्यानंतर आता तर महिला क्रिकेट संघाने तर चार चाँद लावत इंग्लंडच्या महिला संघाला नमवत अख्खी सीरीजच खिशात घातली.

त्यातही भारतीय खेळाडू दीप्ती शर्माने तर विक्रम केला, ती जगातील नंबर वन खेळाडू बनली असून तिने पाकिस्तानी खेळाडूला मागे टाकत हा ऐतिहासिक विक्रम रचला आहे.

Deepti Sharma

भारताने 1 विरुद्ध 3 सामने जिंकत मालिका घातली खिशात

भारतीय महिला टीमने ५ सामन्याच्या मालिकेतील चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडला हरवून टीम इंडियाने मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताने मँचेस्टर टी- २० मालिकेत जबरदस्त विजय मिळवून इतिहास रचला. याआधी भारताने इंग्लंडमध्ये एकही टी - २० मालिका जिंकली नव्हती, या सीरीजचा एक सामना अजूनही शिल्लक आहे.

दीप्ती शर्मा बनली जगातील दुसरी खेळाडू

चौथ्या टी-२० सामन्यात दीप्ती शर्माने तिच्या अफलातून गोलंदाजीने इंग्लिश महिलांचा पराभव केला. दीप्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या ३०० विकेट्स पूर्ण करून मोठी कामगिरी केली. दीप्ती शर्मा आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी दुसरी गोलंदाज बनली आहे. ऑस्ट्रेलियाची मध्यमगती गोलंदाज मेगन शट टी-२० क्रिकेटमध्ये दीप्ती शर्माच्या पुढे आहे, तिने १५१ विकेट्स घेतल्या आणि दीप्ती शर्माने १२८ सामन्यांमध्ये एकूण १४५ विकेट्स घेतल्या आहेत.

पाकिस्तानी गोलंदाचाला मागे टाकले

दीप्ती शर्मा हिने पाकिस्तानच्या निदा दार हिला मागे टाकले आहे. निदाने टी-२० क्रिकेटमध्ये १६० सामन्यांमध्ये एकूण १४४ विकेट्स घेतल्या आहेत. दीप्तीने तिला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. आता दिप्तीच्या नावावर १४५ विकेट्स आहेत. फिरकी गोलंदाज म्हणून या स्थानावर पोहोचणारी ती पहिली फिरकी गोलंदाज आहे.

कशी आहे दिप्ती शर्माची कारकीर्द

  • दीप्तीने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • तिने आपली फिरकी गोलंदाजीची बाजू चोखपणे सांभाळली आहे.
  • ५ कसोटी सामन्यांमध्ये तिने एकूण २० विकेट्स घेतल्या आहेत.
  • १०६ एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने १३५ विकेट्स घेतल्या आहेत.
  • १२८ टी-२० सामन्यांमध्ये तिने १४५ विकेट्स घेतल्या आहेत.
  • विशेष म्हणजे ती भारताची सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू आहे.
  • दीप्ती शर्माने तिन्ही फॉरमॅटमध्ये ३ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+