Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बीसीसीआयचा मोठा निर्णय ! भारतीय संघाची खराब कामगिरी पाहून उचललं मोठं पाऊलं

BCCI new guidelines: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. विशेषतः ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लज्जास्पद पराभवानंतर बीसीसीआय खेळाडूंवर कठोर कारवाई करण्याच्या मनःस्थितीत आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी गमावली आहे.

भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर

गेल्या दोन वेळा भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला होता. पण यावेळी ते होऊ शकले नाही. प्रथम न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत भारताचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. सलग दोन मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्नही भंगलं आहे.

Bcci

बीसीसीआयने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

या पराभवांमुळे संघाच्या तांत्रिक आणि मानसिक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. भारतीय क्रिकेटसाठी एक धडा देखील असू शकतो, जेणेकरून ते त्यांच्या कमजोरीवर काम करू शकतील आणि मजबूत टीम बनून पुढे जाऊ शकतील. पण दरम्यान, बीसीसीआय खेळाडूंवर कारवाई करण्याच्या मनःस्थितीत आहे. भारतीय खेळाडूंच्या पत्नींबाबत बीसीसीआयने एक नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

रिपोर्टनुसार भारतीय खेळाडूंना आता त्यांच्या कुटुंबियांसोबत परदेशात प्रवास करताना काही निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे. जर भारतीय संघाला 45 दिवस किंवा त्याहून अधिक काळासाठी परदेश दौऱ्यावर पाठवले गेले तर त्यांच्या कुटुंबियांना तेथे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. संघाची कामगिरी सुधारण्याच्या दिशेने बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे, जेणेकरून खेळाडू फक्त खेळावर लक्ष केंद्रित करू शकतील आणि त्यांची कामगिरी सुधारू शकेल.

भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफच्या कार्यकाळाबाबत नवीन नियम बनवता येतील, असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. सध्या अनेक सपोर्ट स्टाफ सदस्य वर्षानुवर्षे त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, परंतु आता त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांपर्यंत मर्यादित असू शकतो. या निर्णयामागील तर्क असा आहे की, एकाच संघात दीर्घकाळ राहिल्याने संघाच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+