Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धक्कादायक! 'हा' भारतीय क्रिकेटपटू जाऊ शकतो तुरुंगात? लैंगिक शोषणाचा आरोप, बलात्काराचा गुन्हा दाखल

Cricketer Yash Dayal accused of sexual abuse case registered : भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा जलदगती गोलंदाज यश दयाल आता पुन्हा संकटात सापडला आहे, या क्रिकेटपटूवर बलात्काराचा एक नवा गंभीर आरोप लागला आहे, जयपूरच्या एका पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.त्याच्याविरुद्ध यापूर्वीही एका प्रकरणात बलात्काराचा आरोप झाला असून त्यावेळी त्याने मला मानसिकरित्या ब्लॅकमेल केले जात असल्याचे सांगत आपल्यावरील आरोप आणि खंडन केले होते, त्यानंतर आता पुन्हा तो लैंगिक शोषणाच्या आरोपाच्या फेऱ्यात अडकला आहे.

Cricketer Yash Dayal accused of sexual abuse case registered

पीडित मुलीचे म्हणणे काय?

मीडिया रिपोर्टनुसार आणि तक्रारीनुसार, पीडित मुलीची जयपुरमध्ये आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान यश दयालसोबत ओळख झाली होती. त्याने तिला करिअर संदर्भात सल्ला देण्याचा बहाना करून एका हॉटेलमध्ये बोलवले आणि तिथे त्याने मुलीसोबत लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत आहे.

काय म्हणाली पीडित मुलगी?

पीडित मुलीच्या म्हणण्यांनुसार हे प्रकरण दोन वर्षापासून सुरू होते जेव्हा ती अवघ्या 17 वर्षांची होती. आता या प्रकरणात बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात यश दयाल चांगलाच गुंतला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

यश दयालवर यापूर्वीही बलात्काराचा आरोप

यश दयालवर यापूर्वीही बलात्काराचा आरोप झालेला आहे. प्राप्त माहितीनुसार गाजियाबाद येथील एका महिलेने आपले शोषण झाल्याचा आरोप केला होता, त्या प्रकरणात यश दयालयाने पाच वर्ष नातं ठेवून लग्नाचे खोटे आश्वासन देत मानसिक आणि शारीरिक तसेच आर्थिक शोषण केलं आणि कुटुंबाचीही त्याने भेट घडवली असे महिलेच्या आरोपात म्हटलेले आहे. दरम्यान या प्रकरणात अलाहाबाद कोर्टाने दयालयाच्या अटकेपासून संरक्षण दिलेले आहे.

कोण आहे यश दयाल?

यश दयाल हा भारतीय क्रिकेटपटू आहे, 2022 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध त्याची आयपीएलमध्ये एंट्री झाली होती. तो डाव्या हाताने गोलंदाजी करतो. त्याने पदार्पणात सुरुवातीला 11 विकेट घेत सर्वांना चकित केले होते. पुढचा आयपीएल हंगाम यश दयालसाठी फारसा चांगला गेला नाही. अहमदाबादमधील एका सामन्यात रिंकू सिंगने शेवटच्या म्हणजे २० व्या षटकात सलग पाच षटकार मारले आणि केकेआरने टायटन्सविरुद्ध शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवला. तथापि, पुढच्याच वर्षी यश दयालने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले. त्याने १५ विकेट्स घेतल्या आणि जोरदार पुनरागमन केले होते. आता तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+