Wriddhiman Saha: दिग्गज भारतीय खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, न्यूझीलंडविरुद्ध खेळला शेवटचा सामना
Wriddhiman Saha: भारताचा दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा याने रणजी ट्रॉफी हंगामाच्या शेवटच्या सामन्यात क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यष्टिरक्षक म्हणून केलेली उत्कृष्ट कामगिरी आणि भारतासाठी महत्त्वाच्या खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या 40 वर्षीय साहाने रविवारी सोशल मीडियावर ही बातमी दिली आहे.

रिद्धिमान साहाने आपल्या सोशल मिडीया प्लेटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. 'क्रिकेटमधील अद्भुत प्रवासानंतर, हा हंगाम माझा शेवटचा असेल. मी निवृत्त होण्यापूर्वी फक्त रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असताना शेवटच्या वेळी बंगालचे प्रतिनिधित्व करण्याचा मला सन्मान वाटतो. या अविश्वसनीय प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाचे आभार, असं ट्टिट साहाने केलं आहे.
After a cherished journey in cricket, this season will be my last. I’m honored to represent Bengal one final time, playing only in the Ranji Trophy before I retire. Let’s make this season one to remember! pic.twitter.com/sGElgZuqfP
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) November 3, 2024
साहाने भारतासाठी 40 सामने खेळले
साहाने "क्रिकेटमधील शानदार प्रवास" आणि बंगालसाठी हा अंतिम हंगाम अविस्मरणीय बनविण्याच्या त्याच्या वचनबद्धतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. साहाने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी 40 सामने खेळून तीन शतकांसह 1,353 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षक म्हणून त्याच्या असाधारण कौशल्यासाठी ओळखला जाणारा साहा हा भारताचा पहिला-पसंतीचा यष्टीरक्षक-फलंदाज बनला. जेव्हा एमएस धोनीने खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. कसोटीत भारतीय यष्टीरक्षकांनी केलेल्या शतकांच्या बाबतीत तो धोनी आणि ऋषभ पंतच्या नंतर साहाचा नंबर लागतो.
शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा शेवटचा सामना 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध होता. काही उत्कृष्ट कामगिरी करूनही मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील नवीन व्यवस्थापनाने केएस भरतला पंतचा बॅकअप म्हणून आणण्याचा निर्णय घेतल्याने साहाला बाजूला करण्यात आलं.












Click it and Unblock the Notifications