Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आपल्या मॅनेजरच्याच प्रेमात क्लीन बोल्ड झाला रोहित शर्मा, हिटमॅनची लव्ह स्टोरी आहे खास

Rohit Sharma Love Story: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांची प्रेमकहाणी खूप रंजक आहे. रोहित आणि रितिकाची प्रेमकहाणी ही मैदानाबाहेरील एक सुंदर प्रवास आहे. मैत्रीपासून सुरू झालेला प्रवास आयुष्यभराच्या जोडीदारीपर्यंत पोहोचला.

2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या क्रिकेटमधील यश आणि त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास नेहमीच किक्रेटप्रेंमी उत्सुक असतात. आज 30 एप्रिल रोजी हिटमॅन रोहीत शर्माचा वाढदिवस आहे. तो आपला 38 वाढदिवस साजरा करीत आहे.

Rohit Sharma Love Story

लग्नापूर्वी रोहित शर्माला मिळाली होती धमकी

लग्नापूर्वी रोहित शर्माला रितिका सजदेहपासून दूर राहण्याची धमकी मिळाली होती. धमकी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू युवराज सिंग होता. युवराजनेच रोहितला रितिकापासून दूर राहण्यास सांगितले होते. हे खुद्द रोहित शर्माने एका मुलाखतीत सांगितल होते.

रोहित शर्माने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स शोमध्ये सांगितले होते की, एकदा मी शूटवर पोहोचलो होतो. युवराज सिंग आणि इरफान पठाणही तिथे होते. मी युवीला भेटायला गेलो. मी त्याला हॅलो केले. त्यावेळी रितिकाही तिथे बसली होती. युवीने मला पाहताच तो म्हणाला की, ती माझी बहीण आहे, तिच्याकडे पाहूही नकोस आणि दूर राहा. मग मी त्याला म्हणालो, मग काय युवी पा, मी तुला भेटायला आलो आहे.

रोहित आणि रितिकाची पहिली भेट

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांची पहिली भेट 2008 मध्ये एका जाहिरात चित्रीकरणादरम्यान झाली. रितिका ही एक स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर होती आणि ती रोहितच्या क्रिकेटच्या बीझी शेडयूलचे व्यवस्थापन करत होती. त्यावेळी रितिका ही युवराज सिंगची मानलेली राखी बहीण आहे. त्यावेळी युवराजने रोहितला रितिकापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. या व्यावसायिक भेटीमुळे त्यांच्यात मैत्री निर्माण झाली आणि मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.

रोहितने एका मुलाखतीत सांगितले होते की, रितिकाशी त्याची मैत्री खूप नैसर्गिकरित्या वाढली. त्यांच्या भेटी दरम्यान त्यांना एकमेकांबद्दल जास्त जाणून घेण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या समान स्वभावामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. रितिकानेही रोहितच्या शांत आणि साध्या स्वभावाची प्रशंसा केली आहे.

सहा वर्षांच्या डेटिंगनंतर प्रपोज

रोहित आणि रितिका यांनी सहा वर्षे एकमेकांना डेट केले. या काळात त्यांनी अनेक आठवणी एकत्र जपल्या आणि त्यांचे नाते अधिक दृढ झाले. 2015 मध्ये रोहितने रितिकाला एका खास ठिकाणी प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. त्याने मुंबईतील बोरीवली स्पोर्ट्स क्लब निवडला. जिथे त्याने वयाच्या 11व्या वर्षी आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती.

रोहितने रितिकाला एका रात्री बोरीवली स्पोर्ट्स क्लबमध्ये बोलावले आणि तिथे त्याने तिला प्रपोज केले. रितिकाने लगेच होकार दिला, आणि त्यांच्या या क्षणाने त्यांचे नाते अधिक खास बनवले. 3 जून 2015 रोजी त्यांनी एका भव्य समारंभात साखरपुडा झाला. या समारंभाला अनेक बॉलिवूड दिग्गजांनी उपस्थिती होती. त्यामुळे हा सोहळा आणखी लक्षवेधी ठरला.

डिसेंबर 2015 मध्ये विवाह बंधनात अडकला

रोहित आणि रितिका यांचा विवाह 13 डिसेंबर 2015 रोजी मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये थाटात पार पडला. हा विवाहसोहळा अत्यंत भव्य होता. या विवाह सोहळ्यासाठी क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असल्यामुळे रोहितसाठी अंबानी कुटुंबाने एका खास पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे या सोहळ्याला आणखी रंगत आली. रोहित आणि रितिकाचा हा विवाह सोहळा क्रिकेट जगतातील एक अविस्मरणीय ठरला.

लग्नानंतर तीन वर्षांनी 30 डिसेंबर 2018 रोजी रोहित आणि रितिकाला समायरा नावाची मुलगी झाली. या जोडप्याने ही गूड न्यूज सुरुवातीला खासगी ठेवली होती, परंतु नंतर सोशल मीडियावर त्यांनी ही आनंदाची बातमी शेअर केली. समायराच्या जन्मानंतर रोहित आणि रितिकाने आपल्या कुटुंबातील आनंदाचे अनेक क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनाची झलक पाहायला मिळते.

दुसऱ्या मुलाचे आगमन

15 नोव्हेंबर 2024 रोजी रोहित आणि रितिका यांना दुसरे अपत्य झाले, ज्याचे नाव त्यांनी अहान ठेवले आहे. या आनंदाच्या बातमीमुळे रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता.रोहित आणि रितिकाने आपल्या चार सदस्यांच्या कुटुंबाला "F.A.M.I.L.Y - द वन व्हेअर वी आर फोर" असे संबोधले, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबातील प्रेम आणि एकता दिसून येते.

रितिकाची रोहितच्या करिअरमधील भूमिका

रितिका सजदेह ही फक्त रोहितची पत्नीच नाही तर त्याची मॅनेजर, मार्गदर्शक आणि सर्वात मोठी समर्थक आहे. ती स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून काम करते आणि रोहितच्या ब्रँड डील्स आणि करारांचे व्यवस्थापन करते. तिने आपल्या करिअरमध्ये विराट कोहलीसारख्या खेळाडूंसाठीही ब्रँड डील्स मिळवून दिल्या आहेत, ज्यामध्ये टिसॉट, ऑडी, पेप्सी आणि अॅडिडास यांसारख्या मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे. रितिकाच्या या योगदानामुळे रोहितला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक वेळ मिळाला.

रोहितने अनेकदा रितिकाच्या कामाचे कौतुक केले आहे. रोहितने एका मुलाखतीत सांगितले होते की, "रितिका माझ्यासाठी खंबीर आधार आहे. तिच्याशिवाय हे सगळे शक्य झाले नसते. आम्ही एक संघ आहोत, मी यशस्वी होतो तेव्हा ती यशस्वी होते आणि मी अपयशी ठरतो तेव्हा तीही अपयशी ठरते." रितिकानेही रोहितच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली, आणि त्याला एक खेळाडू म्हणून पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+