Champions Trophy 2025 : सेमीफायनलमध्ये भारतीय संघ कोणाशी भिडणार?, जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
Champions Trophy 2025 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आतापर्यंत शानदार कामगिरी केलेली आहे. टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
पहिल्या दोन सामन्यात कसा मिळवला विजय
पहिल्या दोन सामन्यामध्ये भारतीय संघाने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला. त्यानंतर भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धही 6 विकेट्सने विजय मिळवला. परंतु, सेमीफायनलमध्ये भारतीय संघ कोणाशी सामना करेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
परंतु, काही रोचक समीकरणावर नजर टाकणार आहोत, आगामी उर्वरित सामन्यात काही गोष्टी घडत गेल्या तर भारत नेमका कोणाशी सेमीफायनलमध्ये भिडू शकतो, याचे गणित जाणून घेऊया..!
सेमीफायनलमध्ये भारताचा सामना कोणाशी?
भारतीय संघाला आपला शेवटचा गट सामना 2 मार्च (रविवार) दुबई येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. त्या सामन्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. निकाल काहीही असो, भारत मात्र, 4 मार्च रोजी दुबईमध्ये पहिला उपांत्य सामना खेळेल. ग्रुप-अ मध्ये पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या संघाला ग्रुप-ब मध्ये दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संघासोबत सेमीफायनल खेळावी लागेल. गट अ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाचा सामना गट ब मधील अव्वल संघाशी होईल.

भारताव्यतिरिक्त न्यूझीलंड संघानेही सेमीफायनलमध्ये घेतली उडी
भारताव्यतिरिक्त, न्यूझीलंड संघानेही गट-अ मधून उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. तर ग्रुप-ब मधून ऑस्ट्रेलियन संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता ग्रुप- बी मध्ये, दक्षिण आफ्रिका किंवा अफगाणिस्तान यापैकी एकाला सेमीफायनलमध्ये स्थान मिळेल. दरम्यान, अफगाणिस्तानची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता खूपच कमी आहे.
हे ही वाचा : Champion Trophy 2025 : आश्चर्यच.. चॅम्पियन ट्राॅफीत खेळत आहेत 18 भारतीय खेळाडू! 3 पाकिस्तानात खेळणार
..तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असा सामना होऊ शकतो!
जर दक्षिण आफ्रिकेचा संघ शनिवारी शेवटच्या गट सामन्यात इंग्लंडला हरवतो, तर तो गट-ब मध्ये अव्वल स्थानावर राहील. अशा परिस्थितीत, जर भारत न्यूझीलंडविरुद्ध हरला किंवा तो सामना अनिर्णित राहिला, तर दुबईमध्ये होणारा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असा होईल. जरी ऑस्ट्रेलिया ग्रुप-बी मध्ये अव्वल स्थानावर राहिला आणि भारत न्यूझीलंड विरुद्धचा सामना हरला तरी दुबई येथे होणारा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असाच होणार आहे.
हे ही वाचा : Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडलेल्या पाकिस्तान संघाला किती पैसे मिळणार?
जर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा शेवटचा गट सामना जिंकला तर, दुसरीकडे, जर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकला, तर सेमीफायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियन संघाशी होईल. जर भारत अ- गटात अव्वल स्थानावर राहिला तर उपांत्य फेरीत त्यांना अफगाणिस्तानचा सामना करावा लागू शकतो. जर दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडकडून मोठ्या फरकाने हरला तरच त्याची शक्यता आहे.
ग्रुप-A मध्ये कोणत्या संघांचा होता समावेश?
भारत, न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तान यांना अ-गटात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंड संघ दोन सामन्यांत दोन विजयांसह या गटात अव्वल स्थानावर आहे. किवी संघाचा नेट रन रेट 0.863 आहे. दुसरीकडे, भारतीय संघ सध्या दोन सामन्यांत दोन विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचे 4 गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट 0.647 आहे. न्यूझीलंडला हरवले तरच भारत या गटात अव्वल स्थानावर राहू शकेल. दुसरीकडे, बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.
हे ही वाचा : Champions Trophy 2025: भारत -बांग्लादेश संघातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास काय, आधीचे रेकार्ड्स वाचा
गट 'ब' देश सामने गुण रनरेट
- द. आफ्रिका : 2- 3 - 2.140
- ऑस्ट्रेलिया - 2 - 3 - 0.475
- अफगाणिस्तान - 2- 2- 0.990
- इंग्लंड - 2 - 0 - 0.305
चॅम्पियन्स ट्रॉफीचे उर्वरित सामने कुठे व कसे होणार!
1 मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
2 मार्च - न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
4 मार्च - उपांत्य फेरी -1, भारत विरुद्ध ...,
5 मार्च - उपांत्य फेरी -2,--- दुबई
लाहोर ९ मार्च - अंतिम सामना, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळवला जाईल)
१० मार्च - राखीव दिवस












Click it and Unblock the Notifications