Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

PAK vs BAN:पाकिस्तान-बांगलादेश मॅच रद्द! एकही सामना न जिंकता पाकिस्तान संघ चॅम्पियन ट्राॅफीतून बाहेर

Champions Trophy 2025 Pakistan vs Bangladesh match Abandoned : : चॅम्पियन ट्राॅफीतील पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पाऊस थांबून सामना कधी सुरु होतो याची क्रीडा रसिक वाट पाहत होते पण रसिकांच्या आशेवरच पाणी फेरले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत पाकिस्तानने एकही सामना जिंकलेला नाही आणि पाकिस्तानातच या स्पर्धेचे आयोजन झालेले आहे. अर्थात पाकिस्तानला मायदेशी चांगली कामगिरी करता आली नाही.

आज पाकिस्तान बांग्लादेश यांच्यातील सामना पावसामुळे नियोजित वेळेत सुरू होऊ शकला नाही. त्याला पावसाचे मोठे कारण होते त्यातच सोशल मीडियावर या सामन्याचे सतत अपडेट्स येत होते आणि पाकिस्तान आणि बांगलादेश सामना आता सुरु होईल नंतर सुरु होईल पण पावसाने खेळ वाया घातला. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन खेळ पाहण्याचा आनंद घ्यायचा होता, पण त्यांचा पावसाने हिरमोड केला.

Pakistan vs Bangladesh

आयसीसीचे नियम काय सांगतात

आयसीसी इव्हेंट असल्याने नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते आणि षटके कमी होऊ लागतात. दरम्यान, पंचांनी मैदानात जाऊन पाहणी केली मात्र त्यांच्या हातात छत्र्या होत्या, त्यामुळे काय स्थिती आहे हे स्पष्ट झाले. पाऊस थांबल्यानंतरही ग्राउंड्समनला आपले काम करावे लागते. यामुळे जास्त वेळ लागून षटकं मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात. जर खूपच पाऊस आला तर सामना रद्दही होऊ शकतो आणि तसेच झाले हा सामना रद्द झाला आहे.

PAK vs BAN सामना रद्द हाच शेवटचा पर्याय

जर खूपच वेळ सामना सुरु होण्यास लागत असेल तर हा मॅच T20 स्टाईलमध्ये 20 ओव्हरचा सामना आहे. यासाठी देखील एक कट ऑफ वेळ आहे. भारतीय वेळेनुसार, सामना रद्द होण्याची वेळ रात्री 8.02 च्या सुमारास आहे. यानंतर सामना रद्द होईल आणि सामना रद्द झाला आहे.

PAK vs BAN सामन्यात ऑस्ट्रेलिया-आफ्रिका फॉर्म्युला?

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कट ऑफ वेळेपूर्वी रद्द करण्यात आला. त्यामागील कारण म्हणजे कट ऑफ वेळेत पाऊस थांबला असता तर मैदान साफ करण्यास वेळ लागला असता. अशा स्थितीत सामना रद्द करणे योग्य मानले जात होते. पाकिस्तान आणि बांगलादेश सामन्यात परिस्थिती चांगली नसेल, तर असाच निर्णय घेतला जाऊ शकतो पाकिस्तान आणि बांगलादेश सामन्यावेळी हेच आता झाले आहे, दोन्हीही संघ सुमार कामगिरी करुन स्पर्धेबाहेर पडले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+