Champions Trophy 2025 IND vs BAN: आज भारत-बांगलादेश सामना, विराट बरसणार, मॅच कुठे बघायचा? वाचा
Champions Trophy 2025 IND vs BAN live updates : चॅम्पियन ट्राफीत आज टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना जिंकून भारत विजयाचा श्रीगणेशा करण्यास इच्छूक आहे तर दुसरीकडे बांग्लादेश संघ जिंकण्यासाठी आतूर आहे. आज बांगलादेश विरुद्ध दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सामना होणार आहे.या विशेष सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे.
टीम इंडिया आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा आणि बांगलादेशचा कर्णधार नझमुल शांतो यांच्याकडे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासावर नजर टाकली तर या दोन संघांमध्ये फारसे सामने झालेले नाहीत. एक सामना झाला आणि टीम इंडियाने तो जिंकला. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला होता, तो भारताने जिंकला होता.

आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली व्यतिरिक्त भारतीय संघात काही तरुण खेळाडू आहेत. गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद शमीच्या हाती असेल. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंगचाही टीम इंडियात समावेश आहे. भारतीय संघ अतिशय संतुलित दिसत असून भारताला हरवणे बांगलादेशसाठी हे काम सोपे नाही.
विराट, गीलवर भारताची मदार
या सामन्यात भारताकडून विराट कोहली जोरदार खेळ करण्याची अपेक्षा आहे. त्याच्या बॅटमधून बरेच दिवस झाले फारशा धावा निघाल्या नाही आणि त्याने तडाखेबंद शतक ठोकुनही बरेच दिवस झाले. आज विराटची बॅट तळपू शकते तर दुसरीकडे शुभमन गिल हा चांगली बॅटींग करण्याची अपेक्षा आहे. त्याच्या खेळाकडे क्रीडा रसिक डोळे लावून बसले आहेत. यासह सर्वच युवा खेळाडूंकडून चांगल्या खेळाची आज अपेक्षा आहे.
हेही वाचा : Champions Trophy 2025: भारत -बांग्लादेश संघातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास काय, आधीचे रेकार्ड्स वाचा
IND vs BAN सामना थेट कुठे पहायचा
- दोन्ही संघांमधील सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता होईल.
- यानंतर दुपारी अडीच वाजता सामना सुरू होईल.
- या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
- OTT सामना JioHotstar वर थेट येईल.
IND vs BAN मॅच पिच आणि वेदर रिपोर्ट
दुबईची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. संध्याकाळी खेळपट्टी चांगली होते. दुपारी हवामान उष्ण असते परंतु संध्याकाळपर्यंत सर्व गोष्टी स्थिर होतील आणि प्रेक्षक मनोरंजनाची अपेक्षा करू शकतात.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद ऋषी, हर्षित, हर्षित, अरविंद, रविंद्र जडेजा शाभ पंत, वॉशिंग्टन सुंदर
बांगलादेश संघ - सौम्या सरकार, तनजीद हसन, नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), झाकीर अली (रक्षक), मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, तनजीद हसन, मुस्फिकुर रहमान, तन्जीद हसन, मुशफिकर रहिम हृदय, रिशाद हुसेन, परवेझ हुसेन इमोन, नसम अहमद
Champinons Tropy 2025 : भारत Vs बांगलादेश सामन्यात कोण जिंकणार?, दोन्ही संघाचा इतिहास काय?












Click it and Unblock the Notifications