Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाऊस आणि अफगाणिस्तानच्या विजयाने सेमीफायनलचा गुंता वाढला! ब गटात कोण सेमीफायनल गाठणार? कोण घरी जाणार

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन ट्राॅफीमध्ये अ गटातून भारत आणि न्युझीलंड संघ सेमीफायनलमध्ये पोहचला, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाचा खेळ पावसाने वाया गेला. त्यानंतरच्या झालेल्या नवव्या सामन्यात 26 फेब्रुवारी 2025 रोजी अफगाणिस्तानने बुधवारी रात्री चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडचा पराभव करून सर्वांना धक्का दिला. त्यामुळे आता ब गटातील उपांत्य फेरीचे समीकरण पूर्णपणे गुंतागुंतीचे झाले आहे. या गटातील कोणता संघ उपांत्य फेरी गाठू शकतो हे समजून घेऊ. ब गटासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलची परिस्थिती.

ब गटासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलची परिस्थिती

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र उपांत्य फेरीसाठी ब गटाचे समीकरण रोमांचक ठरत आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता ब गटात पेच आहे. कोणता संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आणि कोणता संघ घरी जाणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
अफगाणिस्तानचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता. त्यात अफगणिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Champions Trophy 2025 after Eng vs Afg match B group

ब गटातील सामन्यांचे समिकरण जाणून घ्या

सध्या ब गटात दोन सामने होणार आहेत, यात पहिला ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान आणि दुसरा इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात.. या दोन सामन्यांमुळे कोणता संघ उपांत्य फेरीत पोहोचणार हे ठरेल. अशा स्थितीत हे लक्षात घेऊन संपूर्ण गणित समजून घेतो. आता, ब गटात उपांत्य फेरी गाठण्याची समीकरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अव्वल दोन संघ दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा निकाल ठरवतील

दक्षिण आफ्रिका जिंकल्यास : दक्षिण आफ्रिका (5 गुण) आणि ऑस्ट्रेलिया (3 गुण) उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ऑस्ट्रेलिया जिंकल्यास: ऑस्ट्रेलिया (5 गुण) आणि दक्षिण आफ्रिका (3 गुण) उपांत्य फेरीत जातील.

मग अफगाणिस्तानची शक्यता काय?

अफगाणिस्तानी संघही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल. किंवा इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला हरवावे लागेल, तेव्हा अफगणिस्तानला उपांत्य फेरीची संधी आहे. यासह आणखी एक संधी म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि अफगणिस्तान सामन्यात पावसानेही आपला खेळ दाखवला तरच..

हे घडल्यास दक्षिण आफ्रिका (3 गुण), ऑस्ट्रेलिया (3 गुण) आणि अफगाणिस्तान (2 गुण) यांच्यातील निव्वळ धावगती दर (NRR) हे ठरवेल की कोणते दोन संघ उपांत्य फेरीत जातील. कारण पाऊस पडल्यास ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला प्रत्येकी 1 गुण मिळतील, अशा स्थितीत अफगाणिस्तानचे केवळ 3 गुण असतील.

दुसरीकडे, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केल्यास अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची एकमेव संधी असेल.

गट 'ब' ची सद्यस्थिती

  • खेळलेल्या संघाने गमावलेले गुण NRR जिंकले
  • दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यात एक सामना जिंकला एक सामन्यात पावसामुळे एक गुण असे 3 गुण त्यांचे झाले आहेत आणि नेट रनरेट 2.140 इतका आहे.
  • ऑस्ट्रेलिया संघाने 2 सामने खेळले 1 सामान जिंकला तर त्यांचे गुण 3 झाले असून नेट रननेट 0.475 इतका आहे.
  • अफगाणिस्तान संघाने दोन सामने खेळले त्यात 1 सामना जिंकला असून त्यांचा रनरेट 0.990 आहे.
  • इंग्लंडने 2 सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांचा पराभव झाला असून संघाचा नेट रनरेट -0.305 असा आहे.
  • अफगाणिस्तानचा निव्वळ धावगती (-0.990) खूपच कमकुवत आहे, त्यामुळे त्यांचा मार्ग कठीण दिसत आहे, परंतु जर त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते थेट पात्र ठरतील पण अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठणे जवळजवळ अशक्य आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+