Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 संदर्भात आली मोठी अपडेट; खेळाडूंच्या लिलाव कधी व कुठे होणार, जाणून घ्या सविस्तर

IPL 2025 Auction Date and Venue : आयपीएल 2025 साठी काही दिवसांपूर्वीच सर्व फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. तर अनेक संघांनी कर्णधारांना रिलीज केले. यामध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि केएल राहुलसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. रिटेंशननंतर आता आयपीएल 2025 चा मेगा लिलाव कधी होणार, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. परंतु आता लिलावाची तारीख आणि ठिकाण याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

BCCIकडून अधिकृत घोषणा नाही

मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस आयपीएल 2025 मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. एएनआयने आपल्या एका अहवालात ही माहिती दिली. दरम्यान, अद्याप बीसीसीआयने यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

IPL 2025

सर्व आयपीएल संघाकडून आतुरतेने प्रतीक्षा

न्यूज एजन्सी एएनआयनुसार दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान रियादमध्ये होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून या महिन्याच्या अखेरीस मध्यपूर्वेतील एका मोठ्या शहरात मेगा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात होती, जी आता जवळपास निश्चित मानली जात आहे.

दुसरीकडे, सर्व संघ आयपीएल लिलावाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी लिलावात एकापेक्षा एक मोठे आणि खेळाडू आपले नशीब आजमावताना दिसणार आहेत. ज्यामुळे कोणता संघ कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार आणि कोणत्या खेळाडूंना राईट टू मॅच वापरून संघात घेतले जाणार याबाबत मात्र उत्सुकता लागलेली आहे.

IPL 2025 लिलावापूर्वी रिटेन खेळाडूंची यादी

चेन्नई सुपर किंग्ज

ऋतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी

दिल्ली कॅपिटल्स

अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल

गुजरात टायटन्स

राशिद खान, शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान

कोलकाता नाइट रायडर्स

रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग

लखनौ सुपर जायंट्स

निकोलस पुरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बदोनी

मुंबई इंडियन्स

जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा

राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसन

यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा

सनरायझर्स हैदराबाद

पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड

पंजाब किंग्स

शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+