Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

टीम इंडियासाठी खूशखबर! आशिया कपमध्ये जसप्रित बुमराह खेळणार, त्याने निवड समितीला काय सांगितलं? वाचा

Asia Cup 2025 Jasprit Bumrah to play in competition : भारतीय क्रिकेट टीमसाठी एक मोठी बातमी आहे, आशिया कप स्पर्धेसाठी जसप्रित बुमराहच्या खेळण्याबद्दलची सांशकता आता जवळपास संपुष्टात आली आहे. कारण भारताचा तेज-तर्रार गोलंदाज जसप्रित बुमराह या मालिकेत खेळणार आहे.

जसप्रित बुमराहने निवडकर्त्यांना स्वतः आशिया कपसाठी आपण उपलब्ध असल्याचे कळवले आहे. आशिया कपसाठी १९ ऑगस्टला भारतीय निवड समितीची बैठक होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. या बैठकीत टीम इंडियाच्या टी-२० संघाची निवड होणार आहे. यासंदर्भात अजित आगरकर पत्रकार परिषद घेऊन माहिती जारी करतील.

Asia Cup 2025 Jasprit Bumrah to play in competition

Take a Poll

जसप्रित बुमराह वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच खेळणार

प्राप्त माहितीनुसार, जसप्रित बुमराह आता आशिया कपमध्ये खेळू शकतो. त्याचे टी-२० मध्ये कैक महिन्यांनंतर पुनरागमन होत आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये झाला होता, या सामन्यात जसप्रित बुमराह शेवटचा खेळला होता. त्याने दोन विकेट घेत भारताला विजयश्री मिळवून दिली होती त्यानंतर हा रांगडा गडी आता पहिल्यांदाच टी-२० स्पर्धेत खेळणार आहे.

बुमराह - टी-२० मधील जगातील सर्वोत्तम गोलंदाज

जसप्रित बुमराह हा अत्यंत कमी धावा देणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ७० टी-२० सामन्यात ८९ गडी बाद केले आहेत. त्याची १७.७४ सरासरी आणि ६.२८ इकाॅनामी रेट आहे, हे पाहता तो टी-२० मधील महत्वाचा मोहरा आहे.

जसप्रित बुमराह गेल्या काही दिवसांपासून दुखापतीनेही त्रस्त होता. पाठीच्या दुखण्यामुळे इंग्लड दौऱ्यातच त्याला पाच पैकी तीन कसोटी सामने खेळावे लागले होते, त्याला दोन कसोटीत आराम घ्यावा लागला होता. टी-२० स्पर्धेत गाळावा लागणारा घाम पाहता तो खूप काळ आतंरराष्ट्रीय टी-२० स्पर्धेत खेळलेला नाही.

भारताचा संभाव्य संघ असा असेल

भारताच्या संभाव्य संघात सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत सिंह, हरदीप सिंह, आर. सिंग/शिवम दुबे, इशान किशन/ध्रुव जुरेल, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, यशस्वी जैस्वाल.

अंतीम अकरा संघात यांना मिळेल स्थान

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल.

हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपसाठी भारतीय संघात 'या' खेळाडूंचा समावेश, कुणाला संधी, कुणाला वगळणार? वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+