Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी भारतीय संघात 'या' खेळाडूंचा समावेश, कुणाला संधी, कुणाला वगळणार? वाचा

Asia Cup 2025 Team Indias probable squad : आधीच अनिश्चिततेचे सावट असलेली एशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबर 2025 मध्ये युएईमध्ये होत आहे. यावेळेस ही स्पर्धा टी-20 ट्वेंटी प्रकारात खेळली जाणार आहे. एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आणि दुसरीकडे क्रिकेट खेळण्यासंदर्भात असलेली अनिश्चितता या पार्श्वभूमीवर आता या स्पर्धेचे काय भवितव्य असेल हे तूर्त सांगता येत नाही, पण भारतीय संघात कोणाची वर्णी लागणार हे याचे अंदाज आता समोर येत आहेत.

इंग्लंड दौऱ्यात भारताने तीन टेस्ट मॅच खेळले. या स्पर्धेत भारताने बरोबरी साधली. भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आणि मालिका पराभव टाळला, त्यानंतर नऊ सप्टेंबरपासून आशिया कप स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघ तयार आहे, मात्र अशा स्थितीत भारतीय संघ कसा असेल, संघात कुणाचा समावेश होईल हे आपण जाणून घेऊया.

Asia Cup 2025 Team India probable squad

'या' खेळाडूंना मिळणार संधी

हर्निया सर्जरीनंतर सूर्यकुमार यादव ह्या आशिया कप मध्ये सहभागी होणार आहे, त्याची निवड निश्चितच आहे आणि त्याच्याकडे कर्णधार पद देण्यात येणार आहे. इंग्लड दौऱ्यात चमकदार कामगिरी केलेला भारतीय फलंदाज शुभमन गिल उपकर्णधार असेल. या संघात संजू सॅमसन नंबर तीनवर बॅटिंग करू शकतो, तर सूर्यकुमार यादव नंबर चारवर मैदानात फलंदाजीसाठी उतरू शकेल.

कोण करणार ओपनिंग?

यशस्वी जयस्वाल ओपनर फलंदाज असेल. मिडल ऑर्डरमध्ये तिलक वर्मा आणि श्रेयस यांच्यात संघात स्थान मिळवण्यासाठी चूरस असेल. या स्पर्धेसाठी के. एल. राहुलला खेळवण्यात येणार नाही, त्याला आराम देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

जसप्रित बुमराह खेळणार का?

प्राप्त माहितीनुसार भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराह या स्पर्धेत खेळणार हे आता निश्चित झालेले दिसते, हर्षद राणा हाही या संघात असेल. विकेटकीपर म्हणून दुसरीकडे ईशान किशन आणि ध्रुव जुरेल यांचाही संघात समावेश असेल पण ते खेळताना दिसतीलच असे नाही कारण संजू सॅमसनला अंतीम अकरामध्ये संधी दिली जाईल. शिवम दुबे याचाही टीममध्ये समावेश होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

'हे' ऑलराऊंडर असतील संघात

आशिया कप दौऱ्यासाठी भारतीय टी -20 संघामध्ये हार्दिक पांड्याचे स्थान पक्के आहे, तो मध्यम- जलदगती गोलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून आपली भूमिका यशस्वीरित्या पार पाडेल अशी शक्यता आहे. अक्षर पटेल आणि वाशिंग्टन सुंदर हे ऑलराऊंडर स्पिनर तर संघात असतील पण मुख्य स्पिनर गोलंदाज म्हणून वरूण चक्रवर्तीचे संघात स्थान निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे कुलदीप यादव आणि रवी वैष्णवी हेही संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक आहेत.

भारताचा संभाव्य संघ असा असेल

भारताच्या संभाव्य संघात सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत सिंह, हरदीप सिंह, आर. सिंग/शिवम दुबे, इशान किशन/ध्रुव जुरेल, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, यशस्वी जैस्वाल.

अंतीम अकरा संघात यांना मिळेल स्थान

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+