Asia Cup 2025 Ind vs pak ठरलं! आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? जाणून घ्या संभाव्य समीकरण
Asia Cup 2025 Ind vs pak : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना नेहमीच खास असतो. आशिया कपमध्ये या दोन्ही संघांमध्ये १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये सामना होणार आहे. पण, या स्पर्धेच्या फॉर्मेटनुसार, या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धकांमध्ये एक नव्हे, तर तब्बल तीन सामने होण्याची शक्यता आहे.

तीन सामने कसे होतील?
पहिली लढत: आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. १४ सप्टेंबर रोजी होणारा सामना हा ग्रुप स्टेजमधील पहिला मुकाबला असेल.
दुसरी लढत: ग्रुप स्टेजमधील टॉप-२ संघ सुपर-४ मध्ये जातील. जर भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ सुपर-४ मध्ये पोहोचले, तर ते पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध खेळतील.
तिसरी आणि अंतिम लढत: सुपर-४ मध्ये टॉप-२ मध्ये येणारे संघ फायनलमध्ये प्रवेश करतील. जर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ उत्कृष्ट कामगिरी करून फायनलमध्ये पोहोचले, तर त्यांच्यात तिसरा आणि अंतिम सामना होईल.
या स्पर्धेत उपांत्य फेरी (Semi-Final) नसल्यामुळे, थेट फायनलचा मार्ग आहे, ज्यामुळे तीन सामन्यांची शक्यता निर्माण झाली आहे.
भारत वरचढ ठरणार?
आशिया कपमध्ये पाकिस्तानवर भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. आतापर्यंत टी-२० फॉर्मेटमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये एकूण १३ सामने झाले आहेत. यामध्ये भारताने १० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानला केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. ही आकडेवारी पाहता १४ सप्टेंबर रोजीही भारताचा विजय निश्चित मानला जात आहे.
आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची 15 सदस्यीय संभाव्य घोषणा करण्यात आली आहे. यंदाची स्पर्धा T-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार असल्यामुळे, निवडकर्त्यांनी जलद, तंदुरुस्त आणि आक्रमक खेळाडूंना संधी देण्यावर भर दिला आहे.
इंग्लंडच्या यशस्वी दौऱ्यानंतर टीम इंडिया आता आशिया कपसाठी सज्ज झाली आहे. इंग्लड दौऱ्यातील संघापेक्षा हा संघ वेगळा असेल. यंदा पहिल्यांदाच टी-20 प्रकारात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे त्यामुळे भारतीय संघाची मदार जसप्रित बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल.
भारताचा संभाव्य संघ
फलंदाज: सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर
यष्टीरक्षक: संजू सॅमसन, जितेश शर्मा
अष्टपैलू: हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे
गोलंदाज: जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
हेही वाचा : ो Asia Cup 2025 : विराट, रोहीत, हार्दिक सोडा..! आशिया कपमध्ये 'या' खेळाडूची शंभर टक्के सरस कामगिरी!












Click it and Unblock the Notifications