Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सट्टेबाजी प्रकरणी ED चा मोठा दणका! युवराज सिंग, सोनू सूदसह 'या' दिग्गजांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त

1xBet Case ED Seizes : ऑनलाइन सट्टेबाजी आणि मनी लॉन्ड्रिंगच्या जाळ्यात अडकलेल्या बड्या सेलिब्रिटींविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर सट्टेबाजी ॲप '1xBet' शी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने शुक्रवारी ७.९३ कोटी रुपयांची मालमत्ता कुर्क केली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटमधील दिग्गज युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्यासह बॉलीवूडमधील नामवंत कलाकारांचा समावेश आहे.

1xBet Case ED Seizes

क्रीडा विश्वात खळबळ: युवराज आणि उथप्पा रडारवर

'वनइंडिया हिंदी'च्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेटला दोन विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा स्टार अष्टपैलू युवराज सिंग याची २.५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. तसेच, माजी फलंदाज रॉबिन उथप्पा याची ८.२६ लाख रुपयांची मालमत्ता या कारवाईत अटॅच करण्यात आली आहे. '1xBet' ॲपच्या प्रमोशनसाठी या खेळाडूंना मिळालेली रक्कम ही 'गुन्ह्यातील कमाई' असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

बॉलीवूड आणि टॉलीवूडवरही 'ईडी'ची टाच

केवळ क्रिकेटपटूच नाही, तर मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनाही अंमलबजावणी संचनालयाने दणका दिला आहे. यामध्ये काही राजकारणात असलेल्या अभिनेत्रीसह नेहा शर्मा, अंकुश हाजरा या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

उर्वशी रौतेला: २.०२ कोटी रुपये (मालमत्ता आईच्या नावावर नोंदणीकृत).

  • सोनू सूद: १ कोटी रुपये.
  • नेहा शर्मा: १.२६ कोटी रुपये.
  • मिमी चक्रवर्ती (खासदार व अभिनेत्री): ५९ लाख रुपये.
  • अंकुश हाजरा: ४७.२० लाख रुपये.

एकूण जप्ती १९ कोटींच्या पार

या प्रकरणातील तपासाचा हा दुसरा टप्पा असून, आतापर्यंत या घोटाळ्यात एकूण १९.०७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी ईडीने भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन (४.५५ कोटी) आणि सुरेश रैना (६.६४ कोटी) यांच्यावरही अशाच प्रकारची कारवाई केली होती.

काय आहे नेमके प्रकरण?

'1xBet' हे एक ऑनलाइन सट्टेबाजी ॲप असून ते भारतात बेकायदेशीर मानले जाते. या ॲपद्वारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल परदेशात केली जात होती. ईडीच्या तपासानुसार: १. या सेलिब्रिटींनी ॲपचा प्रचार करण्यासाठी करार केले होते. २. त्यांना मिळालेली रक्कम ही सट्टेबाजीच्या अवैध व्यवसायातून आलेली होती. ३. हे आर्थिक व्यवहार मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या कक्षेत येतात. एजन्सी सध्या या हस्त्यांचे ॲपशी असलेले आर्थिक संबंध आणि त्यांना मिळालेला पैसा बेकायदेशीर मार्गाने तर आला नाही ना, याची सखोल चौकशी करत आहे.

हेही वाचा : IND vs SA: आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियात मोठे बदल! संजू सॅमसनची एन्ट्री, 'हा' वेगवान गोलंदाज बाहेर

हेही वाचा : भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा T20: कधी, कुठे आणि किती वाजता? फ्री लाईव्ह पाहण्याचा 'हा' आहे जुगाड!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+