भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा T20: कधी, कुठे आणि किती वाजता? फ्री लाईव्ह पाहण्याचा 'हा' आहे जुगाड!
IND vs SA 2nd T20 Time Venue and Free Live Streaming : कटक येथे झालेल्या पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १०१ धावांनी लोळवून ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी दणदणीत आघाडी घेतल्यानंतर, आत्मविश्वास दुणावलेली भारतीय टीम आज गुरुवारी (११ डिसेंबर २०२५) न्यू चंदीगढच्या मुल्लांपूर येथे होणाऱ्या दुसऱ्या T20 सामन्यासाठी सज्ज झाली आहे.
मालिका विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे, तर पहिल्या मानहानिकारक पराभवानंतर ७४ धावांवर गारद झालेली दक्षिण आफ्रिका जोरदार पलटवार करण्यासाठी सज्ज आहे. हा हाय-व्होल्टेज मुकाबला कधी, किती वाजता सुरू होणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फ्री मध्ये लाईव्ह पाहण्याचा 'जुगाड' काय आहे, हे जाणून घेऊया.

कधी आणि कुठे होणार दुसरा T20?
दुसरा टी-२० सामना: ११ डिसेंबर २०२५, महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे होणार आहे. हा सामना गुरुवारी म्हणजेच आज ११ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल.)
फ्री मध्ये लाईव्ह पाहण्याचा 'हा' आहे जुगाड!
भारत-दक्षिण आफ्रिका T20 मालिकेचा थरार लाईव्ह पाहण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील एक अगदी मोफत आहे!
दोन्ही संघांसाठी 'बॅटिंग' आहे चिंतेचा विषय!
टीम इंडिया:
मागील सामन्यात शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी निराशा केली. सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून धावा न येणे ही संघासाठी चिंतेची बाब आहे. हार्दिक पांड्याच्या वादळी खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.
दक्षिण आफ्रिका:
मानहानिकारक पराभव आफ्रिकेने ओढावून घेतला. पहिल्या सामन्यात ७४ धावांवर सर्व संघ गारद झाला. मार्करम, डेवाल्ड ब्राविस, स्टब्स यांसारखे स्फोटक खेळाडू असूनही ते भारतीय गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. मालिकेमध्ये टिकून राहण्यासाठी या खेळाडूंनी मोठी खेळी करणे आवश्यक आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असल्याने न्यू चंदीगढच्या मैदानावर नक्कीच कांटे की टक्कर पाहायला मिळेल.












Click it and Unblock the Notifications