Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

14 वर्षीय वैभव सूर्यवशींने रचला इतिहास! आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात कमी वयाचा ठरला क्रिकेटपटू

Vaibhav Suryavarshi creates history : आयपीएलच्या इतिहासात एक अभुतपूर्व घटना घडली आहे. वैभव सूर्यवंशी या अवघ्या चौदा वर्षीय खेळाडूने आज 19 एप्रिल रोजी 2025 राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळवली आहे. IPL मध्ये खेळणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. पहिल्या सामन्यातच 20 अवघ्या चेंडूत 34 धावा त्याने केल्या आणि संघासाठी योगदान दिले. बहारदार फलंदाजी पहिल्या सामन्यात करुन त्याने सर्वांचे लक्षही वेधले.

वैभवचे वय अवघे 14 वर्षे 23 दिवस एवढे आहे. वैभव सूर्यवंशीने आयपीएल सामन्यात प्रवेश करुन एक इतिहास रचला आहे. राजस्थान राॅयलचा कर्णधार संजू सॅमसन आपल्या दुखापतीने त्रस्त आहे, त्यामुळे त्याने सामन्यातून माघार घेतली. त्याच्या जागी आज वैभव सूर्यवंशीला सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

14-year-old Vaibhav Suryavarshi creates history

लखनऊ संघाविरुद्ध वैभव सूर्यवंशीचे पदार्पण

आज लखनऊ आणि राजस्थान राॅयल संघात सामना होत आहे. या सामन्यात राजस्थान संघाकडून खेळण्याची संधी वैभवला मिळाली, यासह वैभवने लखनऊविरुद्ध आपल्या पहिल्या वहिल्या आयपीएल सामन्यापासुन करीअरला सुरूवात केली आहे.

वैभव सूर्यवंशीची जन्मतारिख काय?

वैभव सूर्यवंशी अवघ्या 14 वर्षांचा आहे, त्याचा जन्म 2011 मध्ये झाला आहे. खास बाब म्हणजे जेव्हा 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग आयपीएलची सुरुवात झाली त्यानंतरचा त्याचा जन्म आहे. खरं पाहिलं तर वैभव सूर्यवंशी याने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे; आयपीएलमध्ये खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला जो स्पर्धेच्या सुरुवातीनंतर जन्माला आला.

वैभव सुर्यवंशीआधी कुणाच्या नावावर होता हा विक्रम?

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे संजू सॅमसन हा सामना खेळू शकला नाही. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला आजच्या सामन्यात संधी मिळाली. वैभव सूर्यवंशी हा याआधी सर्वात तरुण किंवा सर्वात कमी वयात आयपीएल खेळणारा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या आधी प्रियदर्शिनी रे बर्मनच्या नावावर हा विक्रम होता. त्याला मागे टाकून सर्वात तरुण आयपीएल पदार्पण करणारा खेळाडू वैभव बनला आहे. यापूर्वी, बर्मन यांनी वयाच्या 16 वर्षे 157 दिवसांमध्ये पदार्पण केले होते.

रणजीत 12व्या वर्षी पदार्पण, IPL मध्ये 1.10 कोटी रुपयांत लिलाव

वैभव सूर्यवंशीने फक्त आयपीएलमध्येच विक्रम केला असे नाही तर रणजी ट्राॅफीतही त्याने विक्रम केला आहे. अवघे 12 वर्षे 284 दिवसाचा असातना त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले, त्याने आतापर्यंत आपल्या फलंदाजीने अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत. वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने IPL 2025 साठी गेल्या वर्षी झालेल्या मेगा लिलावात 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

हेही वाचा : IPL 2025 : आयपीएलमध्ये आतापर्यंतचे टॉप 5 हिट आणि फ्लॉप खेळाडू कोणते जाणून घ्या; कोण जिंकेल ट्रॉफी?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+