IPL 2025 : आयपीएलमध्ये आतापर्यंतचे टॉप 5 हिट आणि फ्लॉप खेळाडू कोणते जाणून घ्या; कोण जिंकेल ट्रॉफी?
IPL 2025 Top 5 Hit and Flop Players : आयपीएलचा रणसंग्राम सुरु असतानाच आणि ही स्पर्धा प्रचंड चुरशीची होत असताना आता एक मोठी बातमी आली आहे. बडे बडे नाव असलेले खेळाडू फ्लाॅप ठरत असून काहींची नावेही फारशी चर्चेत नसलेले खेळाडू आता आपल्या खेळाच्या जोरावर क्रिकेट रसिकांचे लक्ष्य आपल्याकडे खेचत आहेत. फ्लाॅप खेळाडूत दिग्गजांची नावे आहेत.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल करणारे कमी खेळाडू नाहीत पण अनेक असेही खेळाडू आहेत जे आपल्या बॅट आणि गोलंदाजीने फारशी चमकदार कामगिरी करु शकलेले नाहीत. आज आपण टाॅप बेस्ट 5 प्लेयर्स आणि फ्लाॅप 5 प्लेयर्सबद्दल जाणून घेऊया.

1. निकोलस पूरन (LSG)
निकोलस पुरन हा लखनऊ सूपर जायट्ंसचा खेळाडू सलामीवीर म्हणून आपली भूमिका बजावत आहे. लखनऊला गुणतालिकेत वरच्या स्थानावर नेण्यात त्याचा वाटा मोलाचा आहे. त्याने आपल्या बॅटींगच्या जोरावर 7 सामन्यात आतापर्यंत 357 धावा केल्या आहेत.
2. साई सुदर्शन (GT)
गुजरात जायंट्सचा खेळाडू साई सुदर्शन तेवढाच शांत आणि तेवढाच स्फोटक फलंदाज आहे. त्याने आयपीएलच्या हंगामात लक्ष वेधून घेतले आहेत. त्याने 6 सामन्यातून 329 धावा केल्या आहेत.
3. मिचेल मार्श (LSG) - 295
निकोलस पुरनला टक्कर देणारा त्याच्याच लखनऊ सुपर जायंट्स संघातील खेळाडू मिचेल मार्श हा चांगला फळंदाज आहे. त्याने 6 सामन्यात 171.51 च्या सरासरीने 205 धावा काढल्या आहेत. टाॅप खेळाडूत तो तिसरा आहे.
4. नूर अहमद (CSK)
चेन्नई सूपरकिंग्जचा स्टार गोलंदाज नूर अहमद याने आपल्या संघासाठी एकूण 12 विकेट्स घेतल्या आहेत, त्याचा टाॅप खेळाडू म्हणून गौरव होत असून त्याच्याइतक्यात 12 विकेट्स राॅयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा जोश हेझलवूड याने घेतल्या आहेत. दोघेही टाॅप 5 मध्ये समाविष्ट होतात.
5. सुर्यकुमार यादव (MI)
मुंबई इंडियन्सचा सूर्य म्हणावा असा सूर्या अर्थात सूर्यकुमार यादव याने आपल्या फलंदाजीने मुंबईला तारण्याचे काम केले आहे. त्याने आतापर्यंतच्या 7 सामन्यात 151.42 च्या सरासरीने 265 धावा केल्या आहेत.
IPL 2025 आयपीएलमधील टाॅप 5 फ्लाॅप खेळाडू
1. रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)
मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराने आयपीएल 2025 मध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये 0, 8, 13 आणि 17 च्या स्कोअरसह, रोहितने फार चांगला प्रभाव पाडलेला नाही. मुंबईला भक्कम सलामी त्याने दिली नाही ज्यामुळे मुंबई गुणतालिकेत खालच्या पायरीवर आहे.
2. ऋषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स)
तब्बल 27 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या ऋषभ पंतचे आयपीएलमध्ये पुनरागमन निराशाजनक आहे. त्याचा फलंदाजीचा फॉर्म हरवलेला दिसतो. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या आव्हानांमध्ये पंतचा संघर्ष महत्त्वाचा ठरला आहे.
3. ग्लेन मॅक्सवेल (पंजाब किंग्स)
ग्लेन मॅक्सवेल स्फोटक फलंदाज जरी असला तरीही आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जसाठी खेळताना तो फ्लाॅप ठरत आहे. सहा सामन्यांत केवळ 41 धावा केल्या.
4. व्यंकटेश अय्यर (कोलकाता नाइट रायडर्स)
23.75 कोटींना विकत घेतलेला व्यंकटेश अय्यर या खेळाडूची कामगिरी फ्लाॅप दिसतेय. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्याने 29 चेंडूत 60 धावा करून आपली क्षमता दाखवली पण ही लय तो इतर सामन्यात कायम ठेवू शकलेला नाही.
5. पॅट कमिन्स (सनराईजर्स हैदराबाद)
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असलेला हा खेळाडू अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात यशस्वी होताना दिसत नाही. त्याच्या गोलंदाजीवर मागील हंगामासारखा प्रभाव नाही असे दिसते.
कोण जिंकेल आयपीएल 2025 ट्राॅफी?
आयपीएलची ट्राॅफी जिंकण्यासाठी अनेकांनी आपला खेळ पणाला लावला आहे. अनेकजण आपापले दावे करु शकतात पण चाहत्यांना काही वेगळेच वाटत असून आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीचा विचार करता ट्राॅफीचा दावेदार गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपीटल आहेत.












Click it and Unblock the Notifications