Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ना सचिन, ना धोनी, 13 वर्षीय वैभव सुर्यवंशीचा 'हा क्रिकेटर' आहे रोल मॉडेल

Vaibhav Suryavanshi : आयपीएल 2025 लिलावात सर्वात तरुण खेळाडू म्हणून निवडलेल्या भारताचा युवा खेळाडू वैभव सुर्यवंशीने त्याचा रोल मॉडेल कोण याचा खुलासा केला आहे. यामध्ये धोनी, विराट, सचिनचे नाव नसून वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटरचं नाव घेतलं आहे.

बिहारच्या समस्तीपूर येथील मूळचा रहिवासी असलेल्या वैभव सूर्यवंशीने त्याचा रोल मॉडेल म्हणून ब्रायन लाराचं नाव घेतलं आहे. वैभव सध्या 2024 ACC अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत खेळत आहे. शनिवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुध्द पाकिस्तान अंडर-19 च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.

vaibhav suryavanshi

'ब्रायन लारा माझा रोल मॉडेल'

आशिया कप 2024 चा भारत विरुध्द पाकिस्तान अंडर 19 चा सामना सुरु होण्यापुर्वी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना वैभव म्हणाला की, "मी सध्या खेळावर लक्ष केंद्रीत करत आहे . आजूबाजूला जे काही घडत आहे, त्याची मी पर्वा करत नाही. मला आधी आशिया चषकावर लक्ष केंद्रित करायचे आहे. पुढे बोलताना वैभव म्हणाला की, 'ब्रायन लारा माझा आयडॉल आहे' मी त्याच्यासारखे खेळण्याचा प्रयत्न करतो, बाकी मी माझ्याकडे असलेल्या सर्व कौशल्यांसह नैसर्गिकरित्या खेळण्याचा प्रयत्न करतो आणि मला त्यावर काम करायचं आहे", असं त्याने सांगितलं आहे.

आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू

आयपीएल मेगा लिलावादरम्यान सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. लिलावात 13 वर्षीय खेळाडूसाठी ही मोठी बोली होती. या बोली दरम्यान राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते.पण शेवटी राजस्थान रॉयल्स विजयी बोली जिंकली.

27 मार्च 2011 रोजी बिहारमध्ये जन्मलेला वैभव आयपीएल 2025 मेगा लिलावातील सर्वात तरुण खेळाडू आहे. जानेवारी 2024 मध्ये त्याने बिहारसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हा तो फक्त 12 वर्षे आणि 284 दिवसांचा होता. गेल्या महिन्यात वैभव चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या अंडर-19 सामन्याचा भाग होता, जिथे त्याने 58 चेंडूत शतक झळकावलं होतं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+