Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शेतक-याला एका झाडाची भरपाई म्हणून मिळाले 1 कोटी रुपये, झाडाची ओळख पटवण्यासाठी यूटूबची मदत

यवतमाळ येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवर असलेल्या 100 वर्षे जुन्या लाल चंदनाच्या झाडासाठी अंतरिम भरपाई म्हणून 1 कोटी रुपये जमा करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्य रेल्वेला दिले आहेत. रेल्वेने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत 9 एप्रिल 2025 रोजी पैसे जमा केले. उच्च न्यायालयाने शेतकऱ्याला जमा केलेल्या 50 लाख रुपये रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे.

केशव शिंदे यांचा मुलगा आणि याचिकाकर्त्यांपैकी एक पंजाब शिंदे यांनी त्यांच्या जमिनीवर आंब्याच्या बागा आणि इतर फळझाडे होती ज्यासाठी भरपाई देण्यात आली होती. मात्र लाल चंदनाच्या झाडांसाठी आणि पाईपलाईनसाठी भरपाई देण्यात आली नाही. 2014 पासून शिंदे कुटुंबाने वारंवार जिल्हाधिकारी, वन विभाग, रेल्वे आणि पाटबंधारे विभागाकडे संपर्क साधला आहे, परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही. आठ वर्षांच्या लढाईनंतर शिंदे कुटुंबाने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि कायदेशीर लढाई सुरू केली.

Red sandalwood

झाडाची ओळख पटवण्याकरीता शेतक-यांने घेतली यूटूबची मदत

पंजाब केशव शिंदे यांच्या 2.29 हेक्टर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतात एक झाड आहे. हे झाड कशाचे आहे हे शिंदे परिवाराला माहीतीही नव्हते. त्यावेळी शेतक-यांने यूटूबची मदत घेत हे झाड कशाचे आहे ते ओळखले. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे असून त्याचे मूल्य समजावून सांगितले. त्यावेळेस शिंदे परिवाराला धक्का बसला. त्यानंतर रेल्वेने भूसंपादन केले. मात्र, या झाडाचे मूल्य देण्याचे टाळाटाळ केली. त्यामुळे या परिवाराने या झाडाचे खाजगीमधून मूल्यांकन काढले. त्यावेळेस त्याचे मूल्यांकन 4 कोटी 97 लाख रुपये सांगितले गेले. मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली.

शिंदे परिवाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हे प्रकरण दाखल केले. न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. आता त्यातील 50 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायला सांगितले असून ते पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच शिंदे यांना पूर्ण मोबदला देण्याच्या दृष्टीने त्या वृक्षाचे मूल्यांकन करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेले आहेत. या प्रकरणावर न्यायमूर्ती अविनाश खरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली.

शिंदे कुटुंबाच्या वकील अंजना राऊत नरवडे म्हणाल्या की, झाडाचे मूल्यांकन केल्यास नुकसानभरपाई सुमारे 5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. वन विभागाचे अधिकारी आणि इतर तज्ञांची समिती झाडाची अंतिम किंमत ठरवेल. रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणादरम्यान 94 वर्षीय केशव शिंदे आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या जमिनीवरील लाल चंदनाच्या झाडाची माहिती मिळाली. यातील काही अधिकारी आंध्र प्रदेशातील होते आणि त्यांनी ते झाड लाल चंदनाचे असल्याचे ओळखले आणि कुटुंबाला त्याची उच्च किंमत सांगितली. शिंदे कुटुंबाने युट्यूब आणि तज्ञांचा सल्ला घेऊन झाडाची ओळख पटवली. यानंतर त्यांनी कायदेशीर प्रक्रियेद्वारे योग्य भरपाईची मागणी केली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+