Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आदित्य ठाकरेंनी वरळी जिंकली! मिलिंद देवरांचा पराभव!

Worli Election Result 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे, शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या तिरंगी लढतीमुळे लक्षवेधी ठरलेला वरळी विधानसभा मतदारसंघ अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर आदित्य ठाकरे यांनी जिंकला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा यांचा पराभव केला.

महाराष्ट्राचा राजकारणात जे काही अत्यंत महत्त्वाचे मतदारसंघ आहेत त्यात वरळी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. 2019 साली आदित्य ठाकरे यांनी राजकीय पदार्पणासाठी या मतदारसंघाची निवड केली. तेव्हा वरळीचे आमदार असलेले सुनील शिंदे यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची संधी देण्यात आली.

Worli Election Result 2024 Aditya Thackeray win

वरळीच्या किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर होत्या तर वरळीचेच आणखी एक नेते आशिष चेंबूरकर यांना बेस्टचे अध्यक्षपद देण्यात आले आणि राष्ट्रवादीचे वरळीतील वजनदार नेते सचिन अहिर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना उपनेतेपद देण्यात आले होते. विरोधात तगडा उमेदवार नसल्यामुळे आदित्य ठाकरे सहज निवडून आले.

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला. पण आयत्यावेळी उद्धव ठाकरे यांनी युती सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीशी घरोबा केला. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले तर आदित्य ठाकरे उद्धव मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्री होते. त्या काळात शिवसेना विरुद्ध भाजपा हा संघर्ष प्रचंड टोकाला गेला होता. 2022 साली एकनाथ शिंदे आणि शिवसेनेत बंड केले आणि शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले.

सरकार गेल्यानंतर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत अभिनेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेण्यास सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उल्लेख मिंधे गट असा केला जाऊ लागला. 50 खोके एकदम ओके ही घोषणा देखील ट्रेंड करण्यात आली. आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असंवैधानिक मुख्यमंत्री असे संबोधन होते. तसेच खुल्या मैदानात जाहीर चर्चेचे आव्हान देखील देत होते.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांना अवघ्या सहा हजाराचे लीड मिळाल्यामुळे हा मतदारसंघ कमकुवत असल्याची जाणीव महायुतीच्या नेत्यांना झाली होती. आणि त्यामुळेच वरळी विधानसभा मतदारसंघात नीट फिल्डिंग लावण्यास महायुतीने सुरुवात केली. मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे जवळचे मित्र असलेले संदीप देशपांडे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून लढत दिली. आयत्यावेळी शिवसेनेने स्वतःचे राज्यसभा खासदार आणि वरळीच्या उच्चभ्रू वर्तुळात चांगली उठ बस असलेले मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट होते. अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघात निकराची लढत झाली.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+