Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला का झाला?, हल्लेखोर महायुतीतील 'या' पक्षाशी संबंधित!

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला. त्यांना काळं फासण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी घडली. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली आहे. या घटनेनंतर अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा अमोल कोल्हे यांनी निषेध केला. भाजपच्या पदाधिकाऱ्याने हा भ्याड हल्ला केला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावं असे कोल्हे म्हणाले.

Sambhaji Brigade

शाई फेक करणारा दीपक काटे कोण आहे?

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे. दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असल्याची माहिती समोर आली आहे. दीपक काटे याच्या फेसबुक अकाउंटवर देखील भाजप पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे. तर भाजपचा गमजा घातलेला दीपक काटे याचा फोटो देखील समोर आला आहे.

हल्लेखोरांना पकडून कठोर शिक्षा करा अन्यथा...!

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध. हल्लेखोरांना पकडून कठोर शिक्षा करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड मनोज आखरे यांनी केली आहे.नाही तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईल उत्तर देईल. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांना जशास तसा धडा शिकवावा.

प्रवीण गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया काय?

शाईफेकीची घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझ्या हत्येचाच कट केला गेला होता, माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळेच आज मी जिवंत आहे. अन्यथा माझ्या जिवीतावर हल्ला झाला होता, याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अक्कलकोट शहर पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल!

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवधर्म संघटनेचे आणि भाजप पदाधिकारी इंदापुरातील दीपक काटे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अक्कलकोट शहर उत्तर पोलीस ठाण्यात दीपक काटे आणि त्याच्या 6 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+