Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रात्रीस खेळ चाले..! रात्रीतून स्पष्ट होणार चित्र, उद्या शपथविधी... नेमक्या काय चालल्यात घडामोडी?

Who is the Chief Minister of Maharashtra- अभूतपुर्व यश मिळविल्यानंतर महायुती महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची तयारी करत आहे. महायुतीने 240 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. आता महायुतीत कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार व कोण मुख्यमंत्री होणार..? या दोन प्रश्नांचीच उत्सुकता आहे. विशेष म्हणजे महायुतीमधील दोन घटकपक्षांमध्ये विधानसभेच्या निकालानंतर वेगवान घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी बैठका घेत, उत्सुकता ताणली आहे. महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीला जातील अशा चर्चा असतानाच, आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चा वाढल्याने रात्रीतून खलबते होऊन, उद्या थेट शपथविधीच होईल, अशाही चर्चा रंगल्या आहेत.

Devendra Fadnavis

मुंबईत घडामोडी वाढल्या

शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गटाने आपापल्या नूतन आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत सत्तास्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहीती मिळत आहे. दुसरीकडे भाजपच्या गोटात मात्र थोडी शांतता दिसली. भाजपची सगळी सूत्रे थेट दिल्लीतून हालणार असल्याने स्थानिक नेत्यांनी फार चर्चा केलेली दिसली नाही. विधानसभा निवडणुकीत 57 जागांवर विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र मोठ्या घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांना सर्वानुमते गटनेता करण्यात आलं. त्यांना मुख्यमंत्री करा, अशा चर्चा सुरु झाल्या. दुसरीकडे अजित पवार गटानेही दोन-दोन-एक फाँर्म्यूला चर्चेत आणला. त्यांच्या बंगल्यावर बैठक होऊन त्यांनाही गटनेता करण्यात आलं.

भाजपमध्ये अद्याप शांतता

विधानसभा निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने मात्र अजूनही पत्ते उघडलेले नाहीत. मित्रपक्षांनी बैठक घेत नेता निवडीचा निर्णय घेतला. पण भाजपने तब्बल 132 जागा जिंकूनही गटनेता निवडीचा निर्णय घेतला नाही. तसेच मुख्यमंत्री कोण बनेल? याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महायुतीचा आगामी मुख्यमंत्री कोण? याबाबत उत्सुकता वाढली आहे. दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठांचे धक्कातंत्र पाहता गेल्यावेळी शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आले होते. यंदाही भाजप धक्कातंत्र अवलंबताना दिसेल का, अशा चर्चा रंगल्या आहेत.

फडणवीसांची तातडीने दिल्लीवारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहीती समोर येत आहे. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. रात्री साडेदहा वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. तसेच या बैठकीत राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाचा देखील निर्णय होणार असल्याची माहिती आहे. याबाबत आज निर्णय झाल्यास उद्या नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+