Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एकनाथ शिंदेंना दोन ऑफर, मुख्यमंत्री फडणवीसच..? वाचा, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय...

Two offers to Eknath Shinde- महाराष्ट्रात नुक्त्यात विधानसभा निवडणुका झाल्या. महायुतीने एकहाती वर्चस्व राखले. आता महाराष्ट्राच्या 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ काल संपल्यामुळे मुख्यमंत्री कोण व शपथविधी कधी..? हे प्रश्न आहेत. निवडणुकांपूर्वी भाजपने एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, अशा चर्चा होत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने, भाजपच मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचेही बोलले जात आहे. या सगळ्या प्रश्नांत आता भाजपने एकनाथ शिंदे यांना दोन मोठ्या ऑफर दिल्याच्या बातम्या येऊ लागल्याने, या ऑफर कोणत्या व त्या खऱ्या आहेत का, या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Eknath Shinde

काय आहेत शिंदे यांना ऑफर?

शिवसेना शिंदे गटाचा सध्या मुख्यमंत्रीपदावर दावा आहे. त्या बदल्यात भाजपने एकनाथ शिंदे यांना दोन मोठ्या ऑफर दिल्याची माहिती काही मिडिया हाऊसकडून देण्यात आली आहे. पहिली ऑफर आहे उमुख्यमंत्रिपदाची आणि दुसरी ऑफर आहे केंद्रातील मंत्रीपदाची... मात्र त्या दोन्ही ऑफरवर एकनाथ शिंदे नाराज असल्याचेही समजते. त्यांनी आपला मुख्यमंत्रिपदावर दावा कायम ठेवला आहे. दुसरीकडे महायुतीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते. अजित पवार गटाने आपल्या समर्थनाचं पत्रदेखील भाजपला दिलं असल्याचं बोललं जात आहे.

शिंदे गटाचा दावा कायम

सत्तास्थापनेच्या गदारोळात शिवसेना शिंदे गटाने मुख्यमंत्रीपदावरील दावा कायम ठेवला आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती. लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याला पसंती दिली असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं, असा जोरदार आग्रह शिवसेना शिंदे गटाकडून सुरु आहे. महायुतील यश मिळविण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चांगला फायदा झाला, ही योजनाच एकनाथ शिंदे यांची होती, असा दावाही आता शिवसेनेच्या नेत्यांकडून सुरु असल्याच्या चर्चा आहेत.

फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब?

महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु आहे. भाजपने 132 जागा जिंकल्यामुळे भाजप मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दिल्लीतून देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे काय करतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+