Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Who is Revati Sule : कोण आहे सुप्रिया सुळे यांची लेक रेवती, जी होणार नागपूरची सून? जाणून घ्या

Who is Revati Sule : राजकारण्यांच्या गराड्यात असूनही स्वतःची वेगळी ओळख जपणारी आणि बारामतीच्या प्रचार मैदानात सक्रिय दिसलेली शरद पवारांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे आणि उद्योजक सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांची जवळची मैत्रीण स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे या लग्नाचा 'गौप्यस्फोट' झाला असून, रेवती सुळे या नागपूरच्या एका बड्या उद्योजकाच्या घरात सून म्हणून जाणार असल्याचे समोर येत आहे.

Who is Revati Sule

नागपूरचा उद्योजक होणार पवारांचा जावई?

सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, रेवती सुळे यांचे लग्न नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक सारंग लखानी यांच्याशी जुळले आहे. स्मृती शिंदे यांनी या संदर्भात सुतोवाच केल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या विवाहाची उत्सुकता वाढली आहे. सारंग लखानी हे नागपूरमधील प्रस्थापित व्यावसायिक घराण्यातील असून, या विवाहामुळे पवार कुटुंबाचे विदर्भाशी नवे नाते जोडले जाणार आहे.

उच्चशिक्षित रेवती सुळे: लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची पदवी

रेवती सुळे या केवळ राजकीय वारसा लाभलेल्या कन्या नसून त्या अत्यंत उच्चशिक्षित आहेत. त्यांनी नुकतेच जगातील नामांकित 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून (Masters in Public Administration-MPA) ही पदवी प्राप्त केली आहे. सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी सोशल मीडियावर आपल्या लेकीच्या शैक्षणिक यशाचे कौतुक केले असून, माय-लेकीमधील 'स्ट्राँग बॉन्डिंग' नेहमीच दिसून येते.

बारामतीच्या रणांगणात 'रेवती' यांनी केली होती एन्ट्री

मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेवती सुळे यांचे राजकीय कौशल्यही पाहायला मिळाले. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी त्या स्वतः मैदानात उतरल्या होत्या. तीन दिवस रॅली आणि जनसंवादाच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला होता, ज्यामुळे त्यांच्या सक्रियतेची चर्चा संपूर्ण राज्यात झाली होती.

सदानंद सुळे आणि रेवतीचे कुटुंब

शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांचा विवाह सदानंद सुळे यांच्याशी झाला आहे. सुप्रिया सुळेंचे पती आणि रेवतीचे वडील सदानंद सुळे हे स्वतः एक यशस्वी उद्योजक आहेत. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची ओळख अमेरिकेत शिक्षण घेत असताना झाली होती. सदानंद सुळे हे राजकारणापासून दूर आहे. राजकारणापासून दूर राहून व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या सदानंद सुळेंप्रमाणेच त्यांची मुलेही साधेपणा आणि उच्च शिक्षणाला प्राधान्य देतात.

हेही वाचा : पवार कुटुंबात सनई-चौघड्यांचे सूर! सुप्रिया सुळेंची लेक रेवती होणार नागपूरची सून; फडणवीसांची मध्यस्थी

हेही वाचा : अजित पवार विमान अपघात: घातपाताचा संशय? अमोल मिटकरींचा 'सुसाईड बॉम्बर' व 'हिप्नोटिझम'चा दावा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+