Who is Raghuvir Khedkar: 'पद्मश्री' बहुमान मिळवणारे रघूनाथ खेडकर कोण आहेत, ज्यांनी तमाशा जीवंत ठेवला

Who is Raghuvir Khedkar Tamasha Artist : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राच्या लोककलेचा डंका वाजला आहे. तमाशा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि 'सोंगाड्या' म्हणून लोकप्रिय असलेले रघुवीर खेडकर यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सन्मान केवळ एका कलाकाराचा नसून, उपेक्षित राहिलेल्या संपूर्ण तमाशा कलेचा गौरव असल्याचे मानले जात आहे.

Who is Raghuvir Khedkar

वडिलांचे छत्र हरपले, आईने दिले कलेचे बाळकडू

रघुवीर खेडकर यांचा जन्म १९६१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झाला. दुर्दैवाने, त्यांच्या जन्मानंतर अवघ्या तीन वर्षांत १९६४ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांची कोणतीही आठवण नसलेल्या रघुवीर यांना त्यांच्या आईने या कलेचे बाळकडू दिले. १९७० मध्ये एका बालकलाकाराच्या रूपाने त्यांनी तमाशाच्या फडात पाऊल ठेवले आणि तेव्हापासून आजतागायत ५ दशकांहून अधिक काळ त्यांनी ही कला जोपासली आहे.

"माझ्या सात पिढ्यांचा उद्धार झाला!"

पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर खेडकर भावूक झाले. "मला आत्मीय आनंद झाला आहे. लावणीला आधी सन्मान मिळाला होता, पण तमाशाला पहिल्यांदाच हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळत आहे. यामुळे माझ्या सात पिढ्यांचा उद्धार झाला," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ही व्यक्त केली खंत अन् आव्हान

खेडकर म्हणाले - लोकांचे तमाशावरील प्रेम अफाट आहे पण... त्यांनी मुळ मुद्द्यावर भाष्य केले ते म्हणजे तमाशासमोरील आधुनिक आव्हाने.. याबाबत सांगताना खेडकर म्हणाले की, आजही तमाशा रंगविला जातो, पण आता तिकीट खरेदी करून चिखलात 5 तास नाटक पाहण्याची लोकांची मानसिकता नाही, त्यांना खुर्च्या हव्या आहेत. त्यांच्या मते, स्पर्धा आयोजकांनी खुर्च्यांची व्यवस्था केल्यास प्रेक्षकांची संख्या नक्कीच वाढू शकते, कारण लोकांकडे आता तेवढा वेळ नाही. तथापि, लोकांचे तमाशाबद्दलचे प्रेम अफाट आहे आणि "आपण ज्या गावात जातो, तेथे संध्याकाळपर्यंत हे लगेच कळते" याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.

कडू घोट गिळून कलेची सेवा

खेडकर यांचा प्रवास सोपा नव्हता. एकेकाळी तमाशाकडे समाज हीन भावनेने पाहायचा. "लोक आम्हाला वेगळे समजायचे, पण मी लोकांच्या मनातल्या त्या विचित्र धारणा मोडीत काढण्यासाठी संघर्ष केला. लोकांची बोलणी आणि कडू घोट गिळून मी रंगभूमीची सेवा करत राहिलो," असे त्यांनी आपल्या संघर्षाबद्दल सांगितले. आज त्यांच्या 'रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर' या लोकनाट्य मंडळात ११० हून अधिक लोकांचा उदरनिर्वाह चालतो.

तरुणांसाठी रोजगाराची संधी

आजच्या काळात तमाशा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून रोजगाराचे उत्तम माध्यम असल्याचे खेडकर सांगतात. सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी याकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आज एका कलाकाराला दिवसाला १,५०० रुपयांहून अधिक मानधन मिळते, ही या कलेची प्रगती असल्याचे त्यांनी नमूद केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+