रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा नेमका वाद काय?, संभाजीराजे छत्रपतींनी काय पुरावे केले सादर!

Controversy of waghya dog samadhi on Raigad Fort : महाराष्ट्रात एकीकडे औरंगजेब कबर आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यावरील 'छावा' चित्रपटाची सद्या चर्चा आहे. अशातच नागपूरात मोठी दंगलीची घटना घडली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागली आहेत. अशातच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद देखील आता समोर आला आहे.

कोल्हापूर गादीचे छत्रपती घराण्याचे वंशज तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडावरून हटवण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र राज्य सरकारला दिलं आहे. मात्र, त्यांच्या या मागणीनंतर वाघ्या कुत्र्याच्या ऐतिहासिक संदर्भांबाबत शोध घेतले जाऊ लागले आहेत.

खरंच शिवरायांकडे वाघ्या नावाचा असा कुठला कुत्रा होता का? यावर चर्चा सुरू झाली. त्यासंदर्भात आता खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. तर त्यांनी पुरावे देखील सादर केले. त्यामुळे आगामी काळात हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

waghya dog samadhi

वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन अनेकदा सवाल?

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. या समाधीची उंची छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षाही जास्त आहे. याआधीही अनेकदा वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसल्याचा मुद्दा सातत्याने शिवप्रेमींकडून केला जात आहे. आता संभाजीराजे छत्रपतींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर चर्चा व्हायला लागली आहे.

RTIमधून काही माहिती आली समोर

संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात महत्त्वाची माहिती स्पष्ट केली. यासाठी त्यांनी पुरातत्व विभागाकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या पुरावे देखील दाखवले. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची मी आज भेट घेतली. त्यांना सविस्तर इतिहास सांगितला. माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून अनेक शिवभक्तांनी पुरातत्व खात्याकडून जे मिळवलं होतं, त्याची माहिती मी त्यांच्याकडे दिली आहे.

"पुरातत्व खात्याने माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे सांगितलं आहे की वाघ्या कुत्र्याचं स्मारक याची त्यांच्या सुरक्षित स्थळांच्या यादीत कुठेही नोंद नाही. वाघ्या कुत्र्याचं स्मारक 1936 ला पूर्ण झालं. 2036 पर्यंत ते स्मारक काढलं नाही तर त्याची नोंद संरक्षित स्थळांच्या यादीत समाविष्ट होईल ही माहितीही पुरातत्व खात्याने दिली आहे. त्यामुळे हा विषय मी घेतला आहे. अनेक शिवभक्तांनीही पूर्वी हा विषय घेतलेला आहे. दुर्दैवाने त्यावर न्याय मिळाला नाही म्हणून मी ही मागणी पुन्हा करत आहे.

वाघ्या कुत्र्यानं खरंच चितेत उडी घेतली का?

छत्रपती शिवाजी महाराजांना अग्नी दिला जात होता तेव्हा वाघ्या कुत्र्यानं त्यात उडी घेतल्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 1925 ला छत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हायच्या आधीची काही छायाचित्र आहेत. 1926 ला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती स्थापन झाली होती. त्या समितीनं स्मारकाचा जीर्णोद्धार पूर्ण केला. त्यावेळी पुरातत्व खात्याने दोन हजार रुपये दिले होते. तेव्हाच्या सरकारने 5 हजार रुपये दिले होते. तेव्हा अनेक शिवभक्तांनीही स्मारकासाठी मदत केली होती. त्यातून शिवरायांचं स्मारक पूर्ण झालं, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

"वाघ्या कुत्र्याचं स्मारक का उभं राहिलं?

वाघ्या कुत्र्याचं स्मारक का उभं राहिलं. यावरुन अनेक वाद पाहायला मिळतात. एकाही इतिहासकाराने सांगितलेलं नाही की वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत म्हणून. शिवाजी महाराजांच्या काळात कुत्रे असू शकतात. स्वत: महाराजांचेही काही कुत्रे असतील. पण राज संन्यास या नाटकातून एक दंतकथा निर्माण झाली. त्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. त्यातून वाघ्या कुत्र्याची दंतकथा निर्माण झाली आणि त्याचं स्मारक तिथे बांधण्यात आलं. असेही त्यांनी सांगितलं.

लक्ष्मण हाके यांनी का विरोध केला?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीच्या समोर जे वाघ्या या कुत्र्याचं स्मारक आहे ते हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपतींनी 31 मार्चपर्यंतच अल्टिमेटम दिला आहे. त्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध दर्शविला. ते म्हणाले की, माझी तमाम ओबीसी आणि धनगर समाजाकडून विनंती आहे की संभाजी राजे यांनी किल्ल्याचं संवर्धन केलं पाहिजे. मात्र रायगडची नासधूस ते करत आहेत. कुत्र्याचं स्मारक हटवण्यास आमचा विरोध आहे. त्यामुळे त्यांनी असा कोणताही इशारा देऊ नये.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+