नरेंद्र मोदी आणि RSSचे नातं काय?, नागपूरात संघ मुख्यालयात भेट का?, त्या दोन वास्तूचं महत्त्व काय?
PM Narendra Modi Visit RSS Headquarters Nagpur : 2014 मध्ये पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही संघ मुख्यालयात गेले नव्हते. ते अनेकदा नागपूरात गेले, परंतु त्यांनी कायम संघ मुख्यालयात जाणं टाळलं. अखेर 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच मोदींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाण्यासाठी आज दि.30 मार्च अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी मुहूर्त मिळाला.
पंतप्रधान मोदी हे रेशीमबागेत गेले. जिथे आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींची समाधीचे त्यांनी दर्शन घेतले.
चला तर मोदी यांच्या भेटीच्या प्रसंगी आज आपण त्यांच्या काही जुन्या आठवणींना देखील उजाळा देऊया. मोदी आणि संघ यांचे नातं काय आहे, भाजप आणि संघ याचं नातं काय आहे, यावर आपण आज नजर टाकून त्यांच्या भेटीमागील उद्देश देखील समजून घेऊया.

आज संघ मुख्यालयात भेटीनंतर मोदी काय म्हणाले ते जाणून घ्या?
हेडगेवारजी आणि पूज्य गुरूजी यांना कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या स्मृतींना जपणाऱ्या या स्मृती मंदिरात येऊन मी भारावून गेलो आहे. भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटन क्षमतांच्या मूल्यांना समर्पित ही जागा राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. संघाच्या या दोन महान स्तंभांची आठवण देणारी ही जागा देशसेवेसाठी समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा केंद्र आहे. आपल्या प्रयत्नांमुळे माँ भारतीचे वैभव सदैव वृद्धिंगत होवो!, आपलाच नरेंद्र मोदी, पंतप्रधान- भारत सरकार.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापन कधी झाली?
नागपूरात हिरवीगार झाडे आणि फुलांच्या रोपांनी वेढलेल्या या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे स्मारक आहे, ज्यांना लोकप्रियपणे 'डॉक्टरजी' म्हणून ओळखले जाते. एकेकाळी काँग्रेस कार्यकर्ते असलेले हेडगेवार 1920 च्या दशकात पक्षापासून वेगळे झाले. 1923 मध्ये नागपूर आणि राज्यातील इतर काही शहरांत हिंदू-मुस्लीम दंगल झाली. यानंतर 1925 मध्ये हेगडेवार यांनी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. ही संघटना हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी समर्पित होती.
रेशीमबागेत संघाच्या प्रमुखांचे स्मृतीमंदिर
1940 मध्ये हेगडेवार यांचं निधन झालं. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत या संघटनेचं नेतृत्व केलं होतं. हेडगेवार यांच्यावर नागपूर येथील रेशीमबाग परिसरातील मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले, जिथे 1962 मध्ये त्यांच्या सन्मानार्थ एक समाधी (स्मारक) बांधण्यात आली, ज्याचे उद्घाटन त्यांचे उत्तराधिकारी गोळवलकर यांनी केले. 1973 मध्ये गोळवलकर यांच्या निधनानंतर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक बांधले. गेल्या काही वर्षांत सर्व स्तरातील लोकांनी या दोन दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या रेशीमबागेतील स्मारकांना भेटी दिल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा हा डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीमंदिराजवळील रेशीमबाग मैदानावर होतो. यानिमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत हे जनतेला संबोधित करत असतात. हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या स्मारकांव्यतिरिक्त या संकुलात अनेक प्रशासकीय कार्यालये, प्रशिक्षण केंद्रे आणि एक अत्याधुनिक सभागृह आहे. संघातील नेत्यांच्या सर्व बैठका व प्रशिक्षण शिबिरे याच ठिकाणी होत असतात.
Visiting Smruti Mandir in Nagpur is a very special experience.
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2025
Making today’s visit even more special is the fact that it has happened on Varsha Pratipada, which is also the Jayanti of Param Pujya Doctor Sahab.
Countless people like me derive inspiration and strength from the… pic.twitter.com/6LzgECjwvI
सरसंघचालकांचे निवासस्थान
नागपुरात असताना सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इतर वरिष्ठ संघाचे पदाधिकारी संघाच्या मुख्यालयातच राहतात. महालच्या गजबजलेल्या गल्ल्यांमध्ये वसलेल्या या इमारतीची स्थापना 1925 मध्ये करण्यात आली होती. अनेक दशकांपूर्वी उभारलेली ही इमारत आजही जशीच्या तशीच आहे. या इमारतीमध्ये साध्या पद्धतीने अनेक खोल्या बांधण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये मूलभूत गरजेसाठी लागणाऱ्या वस्तू आणि थोडेसे फर्निचर लावण्यात आले आहेत.
संघाच्या मुख्यालयातील संग्रहालय
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक संग्रहालय उभारण्यात आलं आहे. जिथे संघाच्या विविध प्रमुखांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या वस्तू, त्यांच्या आठवणी, लिहिलेली पत्रे आणि भेटवस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. या वस्तू एकेकाळी बंदी घातलेल्या संघटनेनं अडचणींना कसं तोंड दिलं याच्या आठवणींना उजाळा देतात. स्वतंत्र भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीन वेळा बंदी घालण्यात आली होती. यातील पहिली बंदी महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर 1948 मध्ये घालण्यात आली. दुसरी बंदी 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात घालण्यात आली, तर तिसरी बंदी 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर घालण्यात आली. त्यानंतर ती उठवण्यातही आली.
संघाच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला
नागपुरातील हेडगेवार स्मृती मंदिर आणि संघाचे मुख्यालय सर्वसामान्यांसाठी खुले आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणांवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यामागचं कारण म्हणजे, २००६ मध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी संघाच्या या दोन्ही ठिकाणांना लक्ष्य केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी तीन अतिरेक्यांना ठार केलं होतं. आरएसएसप्रमुख मोहन भागवत यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ही भारतातील सर्वोच्च श्रेणीची सशस्त्र व्हीआयपी सुरक्षा आहे.
संघाचे आणि मोदींचे नातं काय?
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अतूट नाते आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेले अनेक स्वयंसेवक नंतर भाजपामधून राजकारणात सक्रिय झाले आहेत. आजही भाजपाचा संघटन मंत्री हा संघाकडून दिला जातो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक वर्षे संघ प्रचारक होते. परंतु, पंतप्रधान झाल्यावर त्यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयाच्या भेटीपासून काहीसा दुरावा ठेवला होता.
दर तीन वर्षांनी संघाच्या नागपुरात होणाऱ्या प्रतिनिधी सभेला गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतात. विजयादशमी उत्सव आणि तृतीय वर्ष संघ शिक्षावर्गाचा समारोपीय कार्यक्रम हे संघाचे वर्षातील दोन महत्त्वाचे कार्यक्रम असतात. या दोन्ही कार्यक्रमांना राजकीय, उद्योग, सामाजिक आणि अन्य क्षेत्रातील अनेक नामवंत हजेरी लावतात. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा नितीग गडकरी असो हे लोक संघाच्या मुशीतूनच तयार झालेले आहेत.
यंदा संघाचे शताब्दी वर्ष?
या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेचा 100 वा वर्धापन दिन आहे. आरएसएस त्यांच्या स्थापनेच्या 100 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त शताब्दी वर्ष समारंभाचे आयोजन करत आहे. ज्याद्वारे संघ भारतातील प्रत्येक गाव, प्रत्येक वस्ती, प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल. कर्नाटकात झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीच्या संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी या वर्षीच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. पंचसूत्री आधारावर देशभरात कार्यक्रम घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर मोदी यांची नागपूरात मुख्यालयातील भेट हा त्याचाय भाग असल्याची चर्चा देखील होऊ लागली आहे.
-
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी जाहीर, 'बिनविरोध'साठी हालचाली! -
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
विश्वविजेत्या टीम इंडियावर BCCIकडून पैशांचा पाऊस! ICCपेक्षा चौपट अन् 2024च्या पेक्षाही मोठं बक्षीस! -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात










Click it and Unblock the Notifications