आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या या 4 आरत्या तुम्हाला माहित असाव्यात, एक आरती तर आहे खूपच प्रसिद्ध
Vitthal Rukmini Aarti : आज आषाढी एकादशी, या दिवशी लाखो वारकरी आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला पोहचले आहेत. बा विठ्ठला महाराष्ट्रातील बळीराजाला सुखी-समाधानी ठेव अन् संकटं दूर करं असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुजेदरम्यान आज घातले.
आजचा हा सोहळा अलभ्य लाभ आणि सुखकर आहे. जो -तो आपापले दुखः विसरुन विठ्ठलाचे नामस्मरण करतो आणि उपवासही ठेवतो. महाराष्ट्रात हा उत्सव खूपच मोठा असतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल -रुख्मिणी आहे, आणि आज आपण अशा चार आरत्या जाणून घेऊया. ज्या तुम्हाला विठ्ठलाची पुजा करताना उपयोगी पडतील.

1. युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।
तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।।
जय देव ।। 2।।
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवळिती राजा विठोबा सावळा।।
जय देव ।।3।।
ओवाळू आरत्या विठोबा सावळा ।।
जय देव ।।3।।
ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
जय देव ।।4।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।
दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवळिती।।
2. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ॐ विठ्ठला (हिंदी)
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ॐ विठ्ठला ॥धृ॥
मथुरा में आवेला हरी ॐ विठ्ठला, वासुदेव ए विठ्ठला हरी ॐ विठ्ठला
गोकुल में आवेला हरी ॐ विठ्ठला, नंदबाबा ए विठ्ठला
हरी ॐ विठ्ठला ॥1॥
मेवाडा में आवेला हरी ॐ विठ्ठला, मिराबाई ए विठ्ठला हरी ॐ विठ्ठला
जुनागढ में आवेला हरी ॐ विठ्ठला, नरसी मेहता ए विठ्ठला
हरी ॐ विठ्ठला॥2॥
वीरपूर में आवेला हरी ॐ विठ्ठला, जलाराम ए विठ्ठला हरी ॐ विठ्ठला
पंढरपुर में आवेला हरी ॐ विठ्ठला, पुंडलीका विठ्ठला
हरी ॐ विठ्ठला ॥3॥
3. येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥
विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥
4. विठ्ठला मायबापा ।
विठ्ठला मायबापा । वारीं त्रिविधतापा । संसारी त्रासलो मी ॥ वय लागलें मापा ॥ धृ. ॥
बाळपणीं नाठविले ॥ व्यर्थ तारुण्य गेलें ॥ जरा हे दु:ख मोठे ॥ पुढे ठाकुनि आले ॥ विठ्ठला. ॥ १ ॥
भक्तीचा लेश कांही ॥ सत्यमागम नाही ॥ परिणामीं काय आतां ॥ शरण आलों तुझें पायी ॥ विठ्ठला ॥ २ ॥
हरी हरी माझी भ्रांती ॥ म्हणुनी आलो काकूळती ॥ कृपाळुबा जगन्नाथा ॥ तारी गंगाधरसूता ॥ विठ्ठला ॥ ३ ॥












Click it and Unblock the Notifications