Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फडणवीसांचा उजवा हात अन् भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन पुन्हा जामनेरमधून विजयी

Maharashtra Assembly Election 2024 : भाजपचे संकटमोचक आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर हा आपला बालेकिल्ला शाबुत ठेवला. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवारांना पराभूत केले आहे.

भाजपसाठी जामनेरची जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे. कारण तेथून गिरीश महाजन नशीब आजमावत होते. १९९२ साली गिरीश महाजन प्रथम ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. १९९५ सायली जामनेर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले आणि त्यानंतर सातत्याने त्यांनी हा मतदारसंघ जिंकून घेतला. ही त्यांची त्यांची सातवी टर्म आहे.

Maharashtra Assembly Election 2024

जळगाव जिल्ह्यात भाजपचे आमदार असूनही तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांचेच जळगाव जिल्ह्यावर वर्चस्व होते. २०१४ साली हे चित्र पालटले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ खडसे हे महसूल मंत्री झाले. आपल्या ज्येष्ठत्वाला डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याची खंत खडसे यांच्या मनात होती आणि त्यातून भाजपात खडसे - फडणवीस असा संघर्ष सुरु झाला आणि त्यात खडसे पिछाडीवर पडले. याच काळात गिरीश महाजन यांचा महाराष्ट्रराच्या सत्ताकेंद्रातला प्रभावी चेहरा म्हणून उदय झाला. फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून महाजन यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

शेतकऱ्यांचे आंदोलन असो किंवा आलेला महापूर, किंवा कोणत्याही संघटनांशी चर्चा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. प्रत्येक ठिकाणी गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मदतीला धावून गेले आणि फडणवीस यांनीही विश्वासाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. कोल्हापूर येथे आलेल्या महापुरात गिरीश महाजन चक्क पुराच्या पाण्यात उतरले होते. २०१९ साली भाजपचे सरकार गेल्यानंतर गिरीश महाजन हे संकटात सापडले. राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न केले. महाजन यांना अडकवण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले. पण फडणवीस यांनी शिताफीने त्यांचा बचाव केला. महाजन यांना मोक्काच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न चक्क विधिमंडळात पुरावे सादर करून फडणवीस यांनी हाणून पाडला.

राज्यात पुन्हा सत्तेत आल्यानंतर गिरीश महाजन हे संकटमोचकाच्या मूळ भूमिकेत शिरले आणि त्यांनी पूर्वीच्याच धडाक्याने काम करण्यास सुरुवात केली. फडणवीस यांनी त्याच्यावर ग्रामीण विकास खात्याची जबाबदारी सोपवली. आपल्या खात्यात महाजन यांनी चांगली कामगिरी केली. या निवडणुकीत गिरीश महाजन यांना पराभूत करण्याचे प्रचंड प्रयत्न महाविकास आघाडीकडून करण्यात आले. पण महाजन या प्रयत्नांना पुरून उरले. ताज्या विजयामुळे महाजन यांचे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील स्थान आणखी भक्कम झाले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+