वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंच्या पीएची हत्या करायची होती? सहकाऱ्याच्या आरोपांमुळे खळबळ
राजकीय वर्तुळात एक गंभीर आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. वाल्मिक कराड याच्या अडचणींमध्ये लवकरच मोठी वाढ होऊ शकते, कारण त्याच्याच जुन्या सहकाऱ्याने त्याच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेत दावा केला आहे की, कराडचा उद्देश धनंजय मुंडे यांचे खासगी सहाय्यक प्रशांत जोशी यांचा जीव घेण्याचा होता.

बांगर काय म्हणाले?
प्रेस कॉन्फरन्सदरम्यान बांगर म्हणाले की, प्रशांत जोशी यांनी कराडचा फोन न घेतल्याने तो चिडला आणि त्याचा अहंकार दुखावला. त्यानंतर कराडने स्पष्ट शब्दांत त्याला सांगितले की, "प्रशांत जोशी याला संपवायचं आहे." बांगर यांनी दावा केला की, त्यांनी त्याला वारंवार शांत राहण्यास आणि संयम ठेवण्यास सांगितले.
गंभीर आरोपांची मालिकाच
याच परिषदेत विजयसिंह बांगर यांनी आणखी एक खळबळजनक आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, कराडने त्यांच्या समोरच तीन लोकांची हत्या केल्याचा दावा केला आणि तो त्या गुन्ह्यांचा साक्षीदार आहे. महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या शरीराचे अवशेष - कातडं, हाडं आणि रक्त - कराडने टेबलावर ठेवले होते, असा दावा बांगर यांनी केला.
इतकंच नव्हे, तर कराडने त्या हत्याकांडात सहभागी असलेल्या लोकांना शाबासकी दिली आणि त्यांना वाहनांची भेट दिली, अशी माहिती त्यांनी दिली.
धमकी देत पिस्तूल दाखवलं?
बांगर यांचा आणखी एक गंभीर आरोप म्हणजे, कराडने त्यांना धमकावले होते. त्यांनी सांगितले की, "मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही, म्हणून त्याने माझ्या समोर पिस्तूल ठेवले आणि म्हणाला - गोळी झाडून घे नाहीतर तुझ्या शैक्षणिक संस्था मला दे. अन्यथा मी तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून तुला अडकवेन."
कॉल रेकॉर्डिंगही सादर
यावेळी बांगर यांनी कराडचा कॉल रेकॉर्डिंग ऐकवला, ज्यात कराड शिवीगाळ करत असल्याचे ऐकायला मिळाले. या सगळ्या आरोपांमुळे कराडच्या विरोधात वातावरण तापले असून त्याच्या अडचणी आणखी गडद होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications