Satonsh Deshmukh murder case : सतोंष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट, वाल्मिक कराडला पुण्यातून अटक?
Valmik Karad arrested : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी तपास सुरु असून या प्रकरणात आरोप असलेला वाल्मिक कराड यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. 'महाराष्ट्र देशा'च्या वृत्तानुसार, सीआयडीच्या पथकाने वाल्मिक कराड यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात दिले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव आल्यापासून प्रकरण तापले. यात आमदार सुरेश धस यांनीही मुद्दा लावून धरत त्याचे 'आका' शी संबंध असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान हा मुद्दा विधानसभेतही गाजला.

फडणवीसांनी स्पष्ट दिला होता इशारा अन् आश्वासन
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी स्पष्ट करत वाल्मिक कराड असो की, अजून कुणीही त्यांना अटक होणारच असे ठणकावून सांगितले होते तसेच तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो किंवा नेत्याच्या जवळचा असो कारवाई शंभर टक्के होणार हे स्पष्ट केले होते.
हेही वाचा : सरपंच संतोष देशमुख प्रकरणी SPची बदली! 6 महिन्यात SIT चौकशी, कुटुंबियांना 10 लाखांची फडणवीसांकडून मदत
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त
दरम्यान पसार असलेले वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानंतर वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त केली गेली तर त्यांचे आणि नातेवाईकांचे बँक खाते गोठवण्याची प्रक्रीया करण्यात आली.
हेही वाचा : संतोष देशमुखांचे डोळे जाळले नाही! कशी घडली हत्या; CM फडणवीसांनी सभागृहात सर्वच थरारच सांगितला
वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. खंडणीच्या गुन्हा प्रकरणात सध्या वाल्मिक कराड फरार आहेत. दरम्यान, सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी केली आहे. बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये जिथे सीआयडीचं पथक सकाळपासून काम करत आहे. त्यांनी दोन ते अडीच तास पत्नीची चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. हा चौकशीचा भाग होता असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
बीडमध्ये निघाला होता विशाल मोर्चा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध आणि आरोपींना लवकर अटक व्हावी यासाठी बीडमध्ये मोठा मोर्चा निघाला. या मोर्चात असंख्य जनसमुदाय सहभागी झाला होता. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर अटक करण्याबाबत एक दबावही सरकारवर होता. आता यात संशयिताला अटक झाल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : संतोष देशमुखांना मारताना व्हिडीओ कॉल कुणाचा..? आ. सुरेश धसांनी केला मोठा गौप्यस्फोट












Click it and Unblock the Notifications