जी शिक्षा द्याल ती मी भोगण्यास तयार! पोलिसांना शरण येताच वाल्मिक कराडची प्रतिक्रीया, VIDEO व्हायरल
Valmik Karad arrest Update : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी तपास सुरु असून या प्रकरणात खंडणीचा आरोप असलेला वाल्मिक कराड हा सीआयडीसमोर शरण आला. शरण आल्यानंतर त्याने एका व्हिडिओद्वारे आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत असे म्हटले आहे तसेच मी दोषी असेल तर हवी ती शिक्षा भोगण्यास तयार असल्याचेही स्पष्ट केले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव खंडणी प्रकरणात आल्यापासून प्रकरण तापले आहे. यानंतर बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनीही हा मुद्दा लावून धरत वाल्मिक कराड आणि 'आका' याचे कसे संबंध आहेत याचे खुलासे करत दोघांचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान हा मुद्दा विधानसभेतही गाजला आहे.

पोलिसांना शरण आल्यानंतर काय म्हणाला वाल्मिक कराड?
पोलिसांना शरण आल्यानंतर वाल्मिक कराड याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत वाल्मिक कराड म्हणाला की, माझ्याविरोधात केज पोलिस ठाण्यात खोटी खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. मला अटकपूर्व जामीन मिळवण्याचा अधिकार असतानाही मी सीआयडी ऑफीस पुणे पाषाण रोड येथे हजर होत आहे. संतोष भय्या देशमुखांचे जे कुणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी.
हेही वाचा : अशी वेळ कुणावरही येऊ नये... संतोष देशमुखांच्या मुलीचे शब्द ऐकून सगळेच गहिवरले, म्हणाली...
न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार..
वाल्मिक कराड याने पुढे असेही म्हटले की, राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यांच्याशी जोडले जात आहे. पोलिस तपासात जे निष्कर्ष निघेल ते निघेल मी जर दोषी असलो तर न्यायदेवतेने मला जी शिक्षा देईल ती मी भोगण्यास तयार आहे.
https://marathi.oneindia.com/maharashtra/valmik-karad-arrest-update-first-statement-after-surrendering-to-police-santosh-deshmukh-murder-case-015533.htmlहेही वाचा : संतोष देशमुखांचे डोळे जाळले नाही! कशी घडली हत्या; CM फडणवीसांनी सभागृहात सर्वच थरारच सांगितला!
सीआयडी अँक्शनमध्ये
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. सत्ताधारी व विरोधकांनीही हे प्रकरण चांगलेच उचलून धरले. अखेर मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालून सीआयडी चौकशी करावी लागली. सरपंच देशमुख यांच्या हत्येला 18 दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. त्यामुळे आज सीआयडी पथकाने जोर वाढवत फासे फिरवण्यास सुरुवात केली. आज दिवसभर सीआयडी पथकाने बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवाया केल्या.
मंजिरी कराड यांची चौकशी
फरार संशयीत आरोपी वाल्मिक कराड याचा शोध सुरु आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सीआयडी पथकाचे जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी वाल्मिक कराड यांची पत्नी मंजिरी कराड यांना चौकशीसाठी बोलावले. सुमारे 40 मिनिटे मंजिरी कराड यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीआयडी पथकाने त्यांना सोडून दिले. मात्र त्यानंतर कराड यांचे दोन अंगरक्षक व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना चौकशीसाठी बोलावले होते.












Click it and Unblock the Notifications